Jose Butler hit brilliant six  Dainik Gomantak
क्रीडा

Video: दोन टप्प्यांवर बटलरचा गगनचुंबी षटकार

आयपीएलनंतर नेदरलँडविरुद्ध जॉस बटलरची बॅट थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही जोस बटलरची बॅट थांबण्याचे नाव घेत नाही आहे. बटलरने नेदरलँड्सविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत गोलंदाजांवर दया दाखवली नाही आणि तीन सामन्यांच्या दोन डावात एक शतक आणि अर्धशतकांसह एकूण 248 धावा केल्या. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्याने 64 चेंडूत नाबाद 86 धावा करत इंग्लंडला सहज विजय मिळवून दिला. (Jose Butler hit brilliant six)

बटलरने 86 धावांच्या या खेळीत 7 चौकार आणि 5 षटकारही मारले. बटलर आणि जेसन रॉय यांच्या झंझावाती खेळीमुळे इंग्लंडने अवघ्या 30.1 षटकांत 245 धावांचे लक्ष्य गाठले. मालिकेत सर्वाधिक 248 धावा केल्याबद्दल बटलरला प्लेयर ऑफ द सिरीजचा किताब देण्यात आला. संपूर्ण मालिकेत बटलरच्या बॅटने 14 चौकार आणि 19 षटकार मारले.

नेदरलँड्सविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात त्याने षटकार ठोकून चाहत्यांचे मनोरंजन केले, मात्र यादरम्यान त्याच्या बॅटमधून असा षटकार लगावल्या गेला ज्यामुळे सगळे क्रिकेटप्रेमी हसायला लागले. ही घटना इंग्लंडच्या डावाच्या 29 व्या षटकात घडली. जेव्हा नेदरलँडचा वेगवान गोलंदाज पॉल व्हॅन मीकेरेनने पाचवा चेंडू टाकला आणि तो 2 टॅप्ससह बटलरपर्यंत पोहोचला.

हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर लेग साईडला होता आणि नियमानुसार, बटलरने हा चेंडू सोडला असता तर त्याचे खूप कौतुक झाले असते पण बटलरने हा चेंडूही सोडला नाही उलट चेंडूला लांब षटकार मारून फाइन लेगवर पाठवले. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडला, त्यामुळे तो नो बॉल होता आणि बटलरला पुढचा फ्री हिटची संधी मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT