Goa Cricket Association Dainik Gomantak
क्रीडा

Pondicherry T20 : गोव्याचा संघ पुन्हा अडखळला; घरसगुंडीनंतरही विदर्भाचा तीन विकेटने विजय

गोव्याला स्पर्धेत सलग दुसरा पराभव पत्करावा लागला

किशोर पेटकर

Pondicherry Inter State T20 Matches:  पुदुचेरी येथे सुरू असलेल्या आंतरराज्य टी-20 क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा संघ पुन्हा एकदा अडखळला. विदर्भ संघाची घसरगुंडी उडाली, मात्र आकाश कोम्बे याने नोंदविलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या बळावर त्यांनी सामना तीन विकेट राखून जिंकला.

मोसमपूर्व सराव या उद्देशाने स्पर्धेत सहभागी झालेल्या गोव्याला स्पर्धेत सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. गोलंदाजांनी सलग दुसऱ्या लढतीत निराशा केली.

१७९ धावांच्या आव्हानासमोर शुभम तारी व विजेश प्रभुदेसाई यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर विदर्भाची ६ बाद ११५ अशी घसरगुंडी उडाली होती.

मात्र नंतर आकाश याने आक्रमक फलंदाजी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. आकाशने मंदार महाले याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली.

जिंकण्यासाठी १७ चेंडूंत ३१ धावांची आवश्यकता असताना शुभमने आकाश याला बाद केले. त्यानंतर अक्षय कर्णेवार व दर्शन नळकांडे यांनी विदर्भाला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर गोव्याने राहुल त्रिपाठी, कश्यप बखले व कर्णधार दर्शन मिसाळ यांच्या चमकदार फलंदाजीच्या बळावर ४ बाद १७८ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

गोवा : २० षटकांत ४ बाद १७८ (स्नेहल कवठणकर ११, राहुल त्रिपाठी ३९- २४ चेंडू, ७ चौकार, कश्यप बखले ४५- ३३ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, दीपराज गावकर २२, दर्शन मिसाळ नाबाद ४५- २७ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, तुनीष सावकार नाबाद ११, दर्शन नळकांडे २-३४)पराभूत

वि. विदर्भ : २० षटकांत ७ बाद १८२ (आकाश कोम्बे ७०- ४२ चेंडू, ४ चौकार, ५ षटकार, मंदार महाले २६, अक्षय कर्णेवार नाबाद ३४, दर्शन नळकांडे नाबाद २०, दर्शन मिसाळ ४-०-४७-१, हेरंब परब ४-०-४७-०, शुभम तारी ४-०-२४-३, विजेश प्रभुदेसाई ४-०-३३-३, विकास सिंग २-०-१५-०, दीपराज गावकर २-०-१५-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT