कोणत्याही परिस्थितीत कळसा भांडूरा प्रकल्प मार्गी लावणार; केंद्रीय मंत्र्यांचे कर्नाटकातील शेतकऱ्यांना आश्वासन

हुबळी येथील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवास्थानाबाहेर आंदोलन केले
pralhad joshi
pralhad joshiDainik Gomantak
Published on
Updated on

Pralhad Joshi Says Government Is Committed To The Implementation Of The Kalasa Banduri Project: म्हादई कळसा भांडूरा योजनेवर केंद्रीय नेत्याने प्रतिक्रीया दिली आहे. कोणत्याही स्थितीत कळसा भांडूरा योजना मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार म्हादई कळसा भांडूरा प्रकल्पाबाबत गंभीर असल्याचे दिसत आहे.

कर्नाटकचे खासदार व केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हुबळी येथील शेतकऱ्यांना प्रकल्पासंबंधीच्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर करून प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मंत्री जोशी यांना दिले.

pralhad joshi
Mapusa Fire News : म्हापसा मार्केटमध्ये केबलला आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

म्हादई कळसा भांडूरा प्रकल्पाच्या कामाच्या अंमलबजावणीसाठी लवकरात लवकर वन आणि पर्यावरण खात्याची मंजुरी देण्यात यावी या मागणीसाठी हुबळी येथील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवास्थानाबाहेर आंदोलन केले.

कळसा भांडूरा प्रकल्पासाठी आवश्यक मंजुरी देण्यास होत असलेल्या विलंबाच्या विरोधात घोषणाबाजी केली. "चार दशकांहून अधिक काळ आंदोलने होऊनही हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. डीपीआर मंजूर होऊन अनेक महिने उलटून गेले असले तरी, केंद्र सरकारकडून काम सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली नाही" असे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले.

pralhad joshi
Calangute Gram Sabha: 'आम्हाला गावात शाश्वत विकास हवा', ODP ला उच्च न्यायालयात आव्हान

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांना प्रकल्प लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले.

ते म्हणाले, "नियोजित व्याघ्र प्रकल्प कॉरिडोरमुळे कळसा भांडूरा प्रकल्पाला अडथळे येत आहेत. म्हादईवरील कळसा भांडूरा प्रकल्पासाठी भाजपने राजकारण केलेले नाही."

"केंद्र सरकारने डीपीआरला मान्यता दिलेली आहे. कोणत्याही स्थितीत हा प्रकल्प मार्गी लागेल असे आश्वासन आंदोलक शेतकऱ्यांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com