Narendra Modi - Venkatesh Prasad X
क्रीडा

World Cup: मोदींच्या ड्रेसिंग रूम भेटीवर वेंकटेश प्रसादची पोस्ट, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा दाखला देत केलं समर्थन

PM Narendra Modi: वनडे वर्ल्डकप 2023 फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाची भेट घेतली होती, याबद्दल वेंकटेश प्रसादने पोस्ट शेअर केली आहे.

Pranali Kodre

Venkatesh Prasad lauded President Narendra Modi's gesture to meet Team India in Dressing Room after lost in CWC23 Final:

वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवत सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले.

दरम्यान, भारतासाठी हा या वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिलाच पराभव ठरला. मात्र, या पराभवामुळे भारताचे तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. या पराभवानंतर संपूर्ण भारतीय संघ निराश झाला होता.

त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघातील खेळाडूंची भेट घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता. याबद्दल आता भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादने कौतुक केले आहे.

वेंकटेश प्रसादने कौतुक करताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फुटबॉलपटू किलियन एमबाप्पे यांचेही उदाहरण दिले आहे.

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सला लिओनल मेस्सीच्या नेतृत्वातील अर्जेंटिना संघाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव स्विकारावा लागला होता. त्यावेळी मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या खेळाडूंची भेट घेतली होती. या सामन्यात एमबाप्पेने ३ गोल केले होते.

प्रसादने मोदी यांनी भावूक झालेल्या शमीला जवळ घेतानाचा आणि मॅक्रॉन यांनी एमबाप्पेला जवळ घेतलेला फोटो शेअर केला आहे.

तसेच प्रसादने पोस्टमध्ये लिहिले की 'अंतिम सामन्यात दुर्दैवी पराभवानंतर खेळाडूंना भेटणे, ही खूप चांगली कृती आहे. यामुळे खेळाडूंचे मनोधैर्य वाढते आणि पराभवानंतर खेळाडूंना भेटण्यातून आदरणीय पंतप्रधानांना कोणताही फायदा नसतो, पण हे केवळ एक माणूसकीचे उदाहरण आहे.'

फिफा वर्ल्डकप अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर फ्रान्सचे पंतप्रधान एमबाप्पे आणि फ्रेंच खेळाडूंना भेटले, तेव्हा टीका करणाऱ्यांनी बराच गोंधळ घातला होता. हा कोणतीही गोष्ट समजून न घेता केलेला केवळ फक्त तिरस्कार होता.'

दरम्यान, क्रिकेट वर्ल्डकप 2023 नंतर मोदींनी दिलेल्या धीराबद्दल भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही कौतुक केले होते. मोदी अंतिम सामना पाहण्यासाठी देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; स्वतःला जेम्स बाँड समजणारा पोलिस अधिकारी

Panaji Spa Ban: पणजीत 'स्पा'ना बंदी! अखेर मनपाला आली जाग; नवीन परवानग्या दिल्या जाणार नाहीत

Siolim: वस्तू पळवायला घरात घुसल्या, स्थानिकांनी ठेवले झाडाला बांधून; शिवोलीत 2 परप्रांतीय महिलांना गावकऱ्यांनी घडवली अद्दल

FDA Raid: दिवाळीसाठी मिठाई घेताय? मग काळजी घ्या! गोव्यात ‘एफडीए’कडून अस्वच्छ कलाकंद, मावा, बर्फी जप्त

Goa Politics: रवी नाईकांनंतर राज्यभरात सर्वमान्य असे नवे नेतृत्व कोण? चाचपणी सुरु; मार्चमध्ये पोटनिवडणूक शक्य

SCROLL FOR NEXT