Mohammad Shami's brilliant bowling will be remembered by future generations of cricket lovers, PM Narendra Modi:
टीम इंडियाने विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले आहे. या सामन्यात एका बाजूला चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत असताना दुसऱ्या बाजूला गोलंदाज मोहम्मद शमीने 7 बळी घेत न्यूझीलंडची फलंदाजी उद्धस्त केली.
मोहम्मद शमीच्या या शानदार गोलंदाजीचे सर्वांनी कौतुक केले. त्याचवेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विजयासाठी टीम इंडियाचे अभिनंदन केले आणि शमीचे विशेष कौतुक केले.
पीएम मोदींनी ट्विटरवर लिहिले की, 'उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीमुळे आजचा उपांत्य फेरीचा सामना आणखी खास झाला. गोलंदाज मोहम्मद शमीची ही शानदार गोलंदाजी क्रिकेटप्रेमींच्या येणाऱ्या पिढ्यांच्या स्मरणात राहील. वेल प्लेड शमी!'
भारतासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात शमीने 57 धावांत 7 बळी घेतले. शमीने प्रथम संघाला सुरुवातीचे यश मिळवून दिले. नंतर त्यानेच न्यूझीलंडची शेवटची विकेटही घेतली.
शमीने प्रथम डेव्हन कॉन्वॉय, रचिन रवींद्र, केन विल्यम्स, डॅरेल मिशेल यांची विकेट घेतली. नंतर त्याने टॉम लॅथम, टिम साऊथी आणि शेवटी लॉकी फर्ग्युसन यांना बाद केले.
उल्लेखनीय आहे की, उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि 397 धावांची मोठी धावसंख्या उभारली.
या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 327 धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींसह अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटींनी टीम इंडियाचे अभिनंदन केले.
रविवारी अहमदाबाद येथे होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल.
दोन वेळचा चॅम्पियन भारत यापूर्वी 1983, 2003 आणि 2011 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. आता पुन्हा एकदा टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे..
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चार गडी गमावून 397 धावा केल्या आणि अशा प्रकारे विश्वचषकाच्या बाद फेरीतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आपल्या नावावर केला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ४८.५ षटकांत ३२७ धावा करून बाद झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.