Venkatesh Iyer
Venkatesh Iyer Dainik Gomantak
क्रीडा

वेंकटेश अय्यरची IPL 2022 मधील कामगिरी लाजिरवाणी, विश्वचषक संघातून पत्ता कट

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या व्यंकटेश अय्यरची कामगिरी या हंगामात सातत्याने घसरत आहे. या मोसमात त्याने केवळ एकच अर्धशतक झळकावले आहे. याशिवाय त्याने या मोसमात फक्त 2 षटके टाकली आहेत. त्यानंतर टी-20 विश्वचषकात स्थान मिळवण्याच्या त्याच्या आशांना धक्का बसू शकतो.

अतिशय खराब कामगिरी

या मोसमातील त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने खूपच खराब कामगिरी केली आहे. त्याने 8 सामन्यात केवळ 126 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 18.00 झाली आहे. या मोसमातही त्याचा स्ट्राइक कमी झाला आहे. या मोसमात त्याचा स्ट्राइक केवळ 102.44 राहिला आहे.

पॉवरप्लेमध्ये वेगवान धावा काढण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या व्यंकटेशला यंदाच्या मोसमातही फारशी कामगिरी करता आली नाही. पॉवरप्लेमध्ये त्याला या मोसमातील 7 डावात केवळ 77 धावा करता आल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 88.50 राहिला आहे. याशिवाय त्याची सरासरी 15.40 अशी आहे. तर या 7 डावात तो 5 वेळा बाद झाला आहे.

हार्दिक पांड्याने या मोसमात 305 धावा केल्या आहेत, तर त्याच्या नावावर 4 विकेट्सही आहेत. त्याचा फॉर्म आणि फिटनेस पाहता त्याला टी-20 विश्वचषकात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत व्यंकटेशला संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला पुन्हा एकदा चांगली कामगिरी करावी लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

SCROLL FOR NEXT