Venkatesh Iyer Gets Engaged Dainik Gomantak
क्रीडा

Venkatesh Iyer : व्यंकटेश अय्यरचा साखरपुडा! श्रुती रघुनाथनला बनवणार आयुष्याचा जोडीदार

Venkatesh Iyer Gets Engaged: भारतीय संघाचा स्टार युवा क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यरने आज श्रुती रघुनाथनला आपल्या आयुष्याचा जोडीदार बनवलं.

Manish Jadhav

Venkatesh Iyer Gets Engaged: भारतीय संघाचा स्टार युवा क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यरने आज श्रुती रघुनाथनला आपल्या आयुष्याचा जोडीदार बनवलं. व्यंकटेश आणि श्रुती यांची आज एंगेजमेंट झाली. अय्यरने चाहत्यांना ही आनंदाची बातमी इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये व्यंकटेश आणि श्रुती दोघेही एंगेजमेंट आउटफिट्समध्ये दिसत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. आता दोघांवरही चाहत्यांकडून आणि मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, श्रुती रघुनाथनने PSG कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समधून B.Com आणि NIFT, भारतमधून फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. सध्या ती बंगळुरु, कर्नाटक येथील लाइफस्टाइल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मर्चेंडाईज प्लॅनर म्हणून काम करत आहेत.

इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केलेल्या पोस्टमध्ये व्यंकटेशने लिहिले की, आयुष्याच्या पुढील अध्यायाकडे #engaged. फोटोमध्ये व्यंकटेशने हिरवा कुर्ता परिधान केलेला दिसत आहे तर श्रुतीने पर्पल कलरची साडी परिधान केली आहे.

दुसरीकडे, व्यंकटेश अय्यरने टीम इंडियासाठी (Team India) 2 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. त्याला गेल्या वर्षीच टीम इंडियात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. व्यंकटेश फलंदाजीसोबत गोलंदाजीही करतो.

दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त 24 धावा आल्या आहेत. याशिवाय, त्याने 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 133 धावा केल्या आहेत आणि गोलंदाजी करताना 5 विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अय्यरने मध्य प्रदेशसाठी चमकदार कामगिरी केली होती.

आयपीएलमध्ये खळबळ उडवून दिली होती

व्यंकटेश अय्यर इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. अय्यरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 36 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 130 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 956 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 7 अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT