Vasco Sports Club Dainik Gomantak
क्रीडा

वास्कोच्या विजयात बीव्हनची छाप; प्रोफेशनल लीग फुटबॉलमध्ये कळंगुट असोसिएशनवर मात

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल (Goa Professional League Football) स्पर्धेत शानदार खेळ केला.

दैनिक गोमन्तक

पणजी: बीव्हन डिमेलोने (Bevan Dimelo) वास्को स्पोर्टस क्लब (Vasco Sports Club) संघातील पदार्पण उल्लेखनीय ठरविताना शनिवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल (Goa Professional League Football) स्पर्धेत शानदार खेळ केला. वास्कोने म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर कळंगुट असोसिएशनला (Calangute Association) 2-0 फरकाने हरविले. धेंपो स्पोर्टस क्लबचा माजी आघाडीपटू बीव्हनने प्रोफेशनल लीग स्पर्धेच्या एका महिन्याच्या खंडात वास्को क्लबशी करार केला. नवी जबाबदारी पेलताना बीव्हनने 43 व्या मिनिटास वास्को क्लबला आघाडी मिळवून दिली. नंतर सामन्याच्या भरपाई वेळेत सॅव्हलॉन फर्नांडिसने वास्को क्लबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सामन्यात एक खेळाडू कमी होऊनही वास्को क्लबने विजय निसटू दिला नाही. त्यांच्या अमित दास याला रेड कार्ड मिळाले.

विश्रांतीला दोन मिनिटे बाकी असताना वास्को क्लबला फ्रीकिक फटका मिळाला. करणच्या फटक्यावर बीव्हनने सेटपिसेस व्यूहरचना यशस्वी ठरविताना अचूक हेडिंग साधत संघाला आघाडीवर नेले. पूर्वार्धात कळंगुट असोसिएशनचे सामन्यावर वर्चस्व होते, मात्र गोल करण्याचा मान वास्कोने मिळविला. भरपाई वेळेत बीव्हनच्या असिस्टवर सॅव्हलॉनने गोलरक्षकाला चकवा देत वास्को क्लबचे पूर्ण तीन गुण निश्चित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ: 'किंग' कोहलीची ऐतिहासिक 'विराट' ओव्हरटेकिंग; मैदानात पाऊल ठेवताच मोडला सौरभ गांगुलीचा मोठा रेकॉर्ड

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

SCROLL FOR NEXT