ईस्ट बंगालची चेन्नईयीनशी गोलशून्य बरोबरी

इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेतील दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीला (Chennaiyin FC) शुक्रवारी ईस्ट बंगालविरुद्ध पूर्ण गुणांनी हुलकावणी दिली.
 Chennaiyin FC
Chennaiyin FCDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेतील दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीला (Chennaiyin FC) शुक्रवारी ईस्ट बंगालविरुद्ध पूर्ण गुणांनी हुलकावणी दिली. सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.

सामना शुक्रवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. स्पर्धेत दोन सामने गमावल्यानंतर ईस्ट बंगालने गुणाची कमाई केली. एकंदरीत त्यांची ही चार लढतीतील दुसरी बरोबरी असून दोन गुण झाले आहेत. बोझिदार बँडोविच यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने सलग दोन सामने जिंकून धडाका राखला होता, मात्र तिसऱ्या लढतीत त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले. चेन्नईयीनचे आता तीन लढतीतून सात गुण झाले आहेत. एका गुणाच्या आघाडीसह त्यांना अव्वल स्थान मिळाले. दोन्ही संघांना सदोष नेमबाजीचा फटका बसला.

 Chennaiyin FC
सलग पराभवामुळे एफसी गोवा चिंतित; नॉर्थईस्टविरुद्ध विजयासाठी प्रयत्न

पूर्वार्धात चेन्नईयीनने आक्रमकतेवर भर दिला, परंतु त्यांना ईस्ट बंगालचा गोलरक्षक सुवम सेन याचा बचाव भेदता आला नाही. त्यामुळे माजी विजेत्यांना आघाडी घेता आली नाही. दुसरीकडे ईस्ट बंगालच्या आक्रमणात विशेष भेदकता नव्हती. त्यांच्या नायजेरियन डॅनियल चिमा चुक्वू याला काही संधी होत्या, पण तो यशस्वी ठरला नाही. सामन्याच्या तासाभरात चेन्नईयीनला आघाडीची सोपी संधी होती. यावेळी कर्णधार अनिरुद्ध थापा याच्या असिस्टवर रहीम अली याच्या फटक्याचा नेम चुकला. उत्तरार्धात ईस्ट बंगालच्या चुक्वू याने दोन वेळा चेन्नईयीनच्या रिंगणात जोरदार धडक मारली, परंतु तो निर्णायक टप्प्यावर प्रतिस्पर्धी बचावफळीत गुंगारा देऊ शकला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com