Vaibhav Suryavanshi  Dainik Gomantak
क्रीडा

Viral Video: "एका सेल्फीसाठी 100 रुपये लागतील!", वैभव सूर्यवंशीने मुलांकडे मागितले पैसे; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Vaibhav Suryavanshi Viral Video: आयपीएल 2026 च्या हंगामात आपल्या विस्फोटक फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची झोप उडवणारा राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी सध्या मैदानाबाहेर चर्चेत आहे.

Manish Jadhav

Vaibhav Suryavanshi Viral Video: आयपीएल 2026 च्या हंगामात आपल्या विस्फोटक फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची झोप उडवणारा राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी सध्या मैदानाबाहेर चर्चेत आहे. सोशल मीडियावर वैभवचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून यात तो दोन लहान मुलांशी सेल्फीच्या बदल्यात पैशांची मागणी करताना दिसत आहे. मात्र, वैभवचा हा 'बिझनेस' नसून त्याचा मजेशीर स्वभाव असल्याचे समोर आले, ज्याचे नेटकरी मोठ्या प्रमाणावर कौतुक करत आहेत.

राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हा गमतीशीर व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये दोन चिमुकले चाहते वैभवकडे धावत येतात आणि सेल्फीसाठी विनंती करतात. यावर वैभव अत्यंत गंभीर चेहरा करुन त्यांना म्हणतो, "मी सेल्फी देण्यासाठी पैसे घेतो. एका सेल्फीचे 100 रुपये लागतील." वैभवचे हे बोलणे ऐकून मुले तिथून जातात आणि खरोखरच 200 रुपये घेऊन परत येतात. मुलांचा निरागसपणा आणि पैसे पाहून वैभवला आपले हसू आवरता आले नाही. त्याने मुलांकडून पैसे न घेता, "मी फक्त मजा करत होतो," असे सांगत त्यांच्यासोबत आनंदाने सेल्फी काढले. वैभवच्या या दिलखुलास आणि विनोदी स्वभावामुळे चाहत्यांमध्ये त्याचे नाव अधिकच लोकप्रिय झाले.

केवळ गंमत-जमतच नाही, तर मैदानावरही वैभवची बॅट सध्या आग ओकत आहे. आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सला बाद फेरीच्या शर्यतीत आघाडीवर ठेवण्यात वैभवचा मोलाचा वाटा आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये 44.62 च्या सरासरीने 357 धावा ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राइक रेट 234.87 इतका प्रचंड असून त्याने या मोसमात 1 शतक आणि 2 अर्धशतकेही झळकावली आहेत. सध्या तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असून राजस्थानला दुसऱ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरायचे असेल, तर वैभवचा हाच फॉर्म महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थानचा पुढील सामना 28 एप्रिल रोजी पंजाब किंग्सविरुद्ध होणार असून त्यातही वैभवच्या फटकेबाजीची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashol MRF Case: 'एमआरएफ'ची मूळ फाईल बीडीओकडे कशी पोहोचली? राशोल कचरा प्रक्रिया शेड प्रकरणात गोवा खंडपीठाचा सवाल

Online Services: सरकारची मोठी डिजिटल सुविधा; आता व्हॉट्स-ॲपवरून मिळणार सरकारी सेवा, AI चॅटबॉटचा शुभारंभ

Goa Casino Case: प्रतिज्ञापत्र वेळेत दाखल करा, अन्यथा दंड! 'कॅसिनो' प्रकरणात गोवा खंडपीठाचा प्रतिवादींना स्पष्ट इशारा

Super El Nino: 450000 लोकांच्या जीवाला धोका! 'सुपर एल नीनो' ठरतोय खतरनाक, भारतसह 11 देशांमध्ये वाढला धोका; 2027 जगासाठी ठरणार विध्वंसक? VIDEO

Porvorim Traffic Congestion: पर्वरीतील 300 मीटरचा पट्टा ठरू शकतो वाहतुकीचा 'हॉटस्पॉट'; उन्नत मार्ग-अटल सेतू जोडणीसाठी नेमका काय उपाय?

SCROLL FOR NEXT