National Junior Archery Championship Dainik Gomantak
क्रीडा

National Junior Archery: राष्ट्रीय ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेत उत्तर प्रदेश, महाराष्ट्राला सांघिक जेतेपद

इंडियन राऊंडमध्ये अनुक्रमे पुरुष, महिला गटात वर्चस्व

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राष्ट्रीय ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेतील (National Junior Archery Championship) इंडियन राऊंड प्रकारातील सांघिक गटात उत्तर प्रदेशने पुरुष, तर महाराष्ट्राने महिला गटात विजेतेपद मिळविले. सांघिक स्पर्धा गुरुवारी कांपाल येथील गोवा (Campal, Goa) क्रीडा प्राधिकरण मैदानावर झाली.

ज्युनियर पुरुष गटात अंतिम लढतीत उत्तर प्रदेशने केरळवर 6-0 असा एकतर्फी विजय मिळविला. महिला गटातील अंतिम लढतीतही याच फरकाने महाराष्ट्राने झारखंडला नमविले.

पुरुष गटात छत्तीसगडला ब्राँझपदक मिळाले, त्यांनी तेलंगणला 5-3 फरकाने पराजित केले. महिला गटातील ब्राँझपदक लढत चुरशीची ठरली. हरियानाने उत्तर प्रदेशचे कडवे आव्हान 29-28 असे निसटते परतावून लावले.

मिश्र गटात महाराष्ट्र अव्वल

समृद्धी पवार आणि अनिकेत गावडे यांच्या शानदार कामगिरीमुळे मिश्र सांघिक गटात महाराष्ट्राने अव्वल स्थान राखले. समृद्धीने 40 मीटरमध्ये 660 गुण, तर 30 मीटरमध्ये 720 गुण नोंदविले. अनिकेतने 652 गुणांची नोंद केल्यामुळे महाराष्ट्राला अग्रस्थान मिळाले. झारखंड दुसऱ्या, तर हरियाना तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मणिपूरच्या अमिरला अग्रस्थान

इंडियन राऊंडच्या वैयक्तिक गटात मणिपूरच्या महंमद अमिर अर्शद खान याने पुरुष गटात 668 गुणांसह अग्रस्थान मिळविले. त्याचा राज्यसहकारी चिंगाखाम बिसॉन सिंग 655 गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला. झारखंडच्या मोहित कुमार याने 659 गुणांसह दुसरा क्रमांक प्राप्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'ओंकार'ची नजर आता वाहनांवर, उगवे येथे लोकवस्तीत घुसून नुकसान करण्यास सुरुवात

Goa Crime: वास्को रेल्वे स्थानकावरून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

IndiGo Flight Cancellation: दाबोळी विमानतळावर प्रवाशांचा आक्रोश

Cricket Controversy: पाकिस्तानी खेळाडूला ICC चा दणका! मैदानावरील गैरवर्तनाबद्दल ठोठावली कठोर शिक्षा Watch Video

Goa ZP Election 2025: जि.पं. निवडणुकीसाठी काँग्रेसची 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; सामाजिक समीकरण साधत 'वादग्रस्त' सांताक्रूझ जागेवर केला दावा

SCROLL FOR NEXT