Major League Cricket Dainik Gomantak
क्रीडा

Major League Cricket: अमेरिकेतही आता IPL फ्रँचायझींच्या टीम! टी20 लीगसाठी MI, CSK सह 'या' संघांनी केली गुंतवणूक

अमेरिकेत पहिल्यांदाच Major League Cricket स्पर्धा खेळवण्यात येणार असून या स्पर्धेसाठी 4 आयपीएल फ्रँचायझींनी गुंतवणूक केली आहे.

Pranali Kodre

Major League Cricket: इंडियन प्रीमियर लीगमधील विविध फ्रँचायझी आजा त्यांचा जगभर विस्तार करण्याकडे लक्ष केंद्रीत करत असल्याचे दिसले आहे. युएई आणि दक्षिण आफ्रिकेतील टी20 लीगमध्येही या फ्रँचायझींनी गुंतवणूक केल्याचे दिसून आले आहे. आता अमेरिकेतही या फ्रँचायझी गुंतवणूक करताना दिसल्या आहे.

अमेरिकेत जुलैमध्ये पहिल्यांदाच मेजर लीग क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या फ्रँचायझींनी गुंतवणूक केली आहे.

मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघांच्या फ्रँचायझी या आयपीएलमधीलच असणार आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्सने न्यूयॉर्क फ्रँचायझी खरेदी केली आहे.

तसेच नाईट रायडर्सने लॉस एंजेल्स फ्रँचायझी खरेदी केली आहे. हे दोन्ही फ्रँचायझी स्वत:च संघ चालवणार आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्सने मॉयक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासह भागीदारीमध्ये सिएटेल फ्रँचायझी खरेदी केली आहे, तर चेन्नई सुपर किंग्सने एका स्थानिक गुणवणूकदारासह टेक्सास फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक केली आहे.

याव्यतिरिक्त या स्पर्धेत वॉशिंग्टन डीसी आणि सॅन फ्रँसिस्को या दोन फ्रँचायझी असणार आहेत. वॉशिंग्टन डीसीचे मालकी हक्क स्थानिक अमेरिकन गुंतवणूकदार संजय गोविलकडे आहे. त्याचबरोबर आनंद राजारमन आणि वेंकी हरिनारायण यांनी सॅन फ्रँसिस्को फ्रँचायझी खरेदी केली आहे.

दरम्यान आयपीएलमधील फ्रँचायझी सध्या जगभर आपल्या ब्रँडच्या विस्तार करताना दिसत आहेत. आत्तापर्यंत कॅरेबियन क्रिकेट लीग, युएईमधील इंटरनॅशनल लीग टी20, दक्षिण आफ्रिका टी20 लीग अशा विविध स्पर्धांमध्ये आयपीएल फ्रँचायझींनी गुंतवणूक केलेली आहे.

अमेरिकेत पहिल्यांदाच मेजर लीग क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात येत आहे. ही स्पर्धा 13 ते 30 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रत्येक संघात कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 18 खेळाडू असणार आहेत, तसेच यामध्ये 9 परदेशी खेळाडूंची जागा असेल. त्याचबरोबर प्लेइंग इलेव्हनमध्ये कमीच कमी सहा खेळाडू अमेरिकेतील असणे आवश्यक असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतीय संघाला मोठा धक्का! 'शर्मा जी के लड़के'ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती, पोस्ट करत म्हणाला...

VIDEO: 'जोपर्यंत भारताचे तुकडे-तुकडे होत नाहीत, तोपर्यंत शांतता नाही', बांगलादेशच्या निवृत्त जनरलनं पुन्हा ओकली गरळ

Raja Mantri Predictions: 2026 मध्ये गुरु 'राजा' तर मंगळ 'मंत्री'! नवीन वर्ष जगात आणि देशात काय मोठे बदल घडवणार?

Goa ZP Election: भाजपची तिसरी यादी जाहीर! जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आणखी 9 उमेदवारांची नावे निश्चित; आतापर्यंत 38 जागांवर कमळाचे उमेदवार

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; हार्दिक-गिलचे पुनरागमन

SCROLL FOR NEXT