Chris Gayle Garba Video Dainik Gomantak
क्रीडा

Chris Gayle Garba Video: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल गरब्यावर थिरकला

क्रिकेट विश्वात अधिराज्य गाजवलेल्या ख्रिस गेलने गरब्यावर डान्स केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

देशात सध्या नवरात्रीची धुम आहे, सर्वत्र गरबा, दांडीयांचा जल्लोष सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या बंधनानंतर मोठ्या थाटामाटात नवरात्र साजरी केली जात आहे. भारतीय संगीत, संस्कृतीची देशा-विदेशात क्रेझ आहे. ख्रिस गेल (Chris Gayle) सध्या भारतात असून, तो नवरात्रोत्सवाचा आनंद घेताना दिसत आहे.

ख्रिस गेल लिजंड लीग क्रिकेटसाठी सध्या भारतात आहे. गेल गुजरात जायंट्स संघाकडून खेळत आहे. पार्टी अॅनिमल अशी ओळख असलेल्या ख्रिस गेलला भारतीय गरब्याने चांगलीच भुरळ घातली असून, त्याने नवरात्रीच्या निमित्ताने जबरदस्त डान्स केला आहे. गेलच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिकेट विश्वात धुमाकूळ घातलेल्या गेलने आता गरबा डान्स करत त्याच्या फॅन्सला सुखद धक्का दिला आहे.

गेलने गुजरात जायंट्स संघाच्या सहकारी खेळाडूंसोबत नवरात्रीचा सण साजरा केला. गुजरात जायंट्सच्या टीमने गेलच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. "युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी ढोलच्या तालावर नाचत आहे." असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.

गेलसह भारतीय फंलदाज वीरेंद्र सेहवाग आणि गुजरात जायंट्सच्या इतर खेळाडूंनीही जोधपूरमध्ये नवरात्रीचा उत्सव साजरा केला. सर्व खेळाडूंनी पारंपरिक संगीतावर जबरा नृत्य केले. विशेष म्हणजे सर्व खेळाडूंनी पारंपरिक भारतीय पोषाख परिधान केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यरने दुखापतीबद्दल दिली मोठी अपडेट, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Goa Live Updates: रेल्वेच्या धडकेने मये येथे रेडा ठार

Horoscope: सुवर्णयोग! वृषभ, मिथुनसह 5 राशींना प्रचंड आर्थिक लाभ आणि यश; मेष आणि कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टी टाळा

Goa Rain: हातातोंडाशी आलेला घास मातीमोल, 'पर्जन्यराजा' अवेळी कोपला; शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट

Mardol Mobile Tower: म्हार्दोळच्‍या क्रीडा मैदानावरील मोबाईल टॉवरचे काम तूर्त बंद, स्थानिकांचा विरोध; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

SCROLL FOR NEXT