Goa U25's cricket Dainik Gomantak
क्रीडा

Goa U25's Cricket: 'मनीष'ची एकाकी झुंज व्यर्थ; चुरशीच्या सामन्यात झारखंडची सरशी

चुरशीच्या लढतीत गोवा नऊ धावांनी पराभूत

दैनिक गोमन्तक

पणजी: मनीष काकोडे याने खिंड लढविताना हेरंब परब याच्यासमवेत नवव्या विकेटसाठी 62 धावांची झुंजार भागीदारी केली, पण हे प्रयत्न पुरेसे ठरले. त्यामुळे 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याला चुरशीच्या लढतीत झारखंडकडून नऊ धावांनी हार पत्करावी लागली. हा सामना आज हरियानातील गुरुग्राम येथे पार पडला.

(Under-25 ODI cricket tournament Jharkhand defeated Goa )

प्रथम फजंदाजी स्विकारत झाररखंडला गोव्याच्या गोलंदाजांनी 229 धावांत गुंडाळले. नंतर कर्णधार मंथन खुटकर (54) याच्या अर्धशतकानंतरही गोव्याची 8 बाद 148 अशी घसरगुंडी उडाली. मंथनने शिवम आमोणकर याच्यासमवेत गोव्याला 54 धावांची सलामी दिली. शिवम बाद झाल्यानंतर गोव्याचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले.

कठीण परिस्थितीत मनीष व हेरंब यांनी झारखंडच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढविला. त्यांनी 48 चेंडूंत 62 धावांची भागीदारी करून गोव्याला आशा दाखविली. विजयासाठी 20 धावा हव्या असताना रौनक याने त्रिफळाचीत बाद केले. आणखी दहा धावानंतर रौनकनेच मनीषला बाद करून झारखंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मनीषने 50 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

झारखंड : 47.4 षटकांत सर्वबाद 229 (व्ही. विशाल 29, आर्यमान सेन 37, विवेक कुमार 25, रॉबिन मिंझ 52, राजन दीप 26, मोहित कुमार 32, हेरंब परब 9-1-29-1, शुभम तारी 9.4-0-52-2, निहाल सुर्लकर 10-1-37-3, कीथ पिंटो 7-0-33-1, मनीष काकोडे 6-0-36-1, योगेश कवठणकर 1-0-15-0, मंथन खुटकर 2-0-9-0, शिवम आमोणकर 3-0-17-1)

वि. वि. गोवा : 48.1 षटकांत सर्वबाद 220 (शिवम आमोणकर 17, मंथन खुटकर 54, कश्यप बखले 3, आनंद तेंडुलकर 11, योगेश कवठणकर 8, सोहम पानवलकर 27, निहाल सुर्लकर 9, कीथ पिंटो 6, मनीष काकोडे 46, हेरंब परब 27, शुभम तारी नाबाद 2, रौनक 2-38, मनीषी 3-49, एस. एम. त्रिपाठी 3-31, राजन दीप 1-38).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT