FIFA World Come Opening Ceremony: फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या उद्गाटन सोहळ्यातून कतारच्या संस्कृतीचे दर्शन

बीटीएस बँडचा गायक जुंगकॉक याच्या लाईव्ह परफॉर्मन्सने जिंकली प्रेक्षकांची मने
FIFA World Come Opening Ceremony
FIFA World Come Opening CeremonyDainik Gomantak
Published on
Updated on

FIFA World Come Opening Ceremony: फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेचा उद्घाटन सोहळा कतारमधील अल बयात स्टेडियमवर मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कतारमधील संस्कृती दर्शवणारा कार्यक्रम सादर झाला.

फ्रान्सचा महान फुटबॉलपटू मार्केल डेसैलीने वर्ल्डकपची ट्रॉफी मैदानावर आणताच, स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी स्टेडियम खचाखच भरले होते.

या सोहळ्यात कतारच्या संस्कृतीची माहिती दिल्यानंतर संर्व संघाचे झेंडे आणि यापूर्वीची स्पर्धेची अँथम साँग्स यांची झलक देखील स्टेडियमवरील उपस्थितीत फुटबॉल चाहत्यांना दाखवण्यात आली. त्यानंतर यंदाच्या वर्ल्डकपचा मॅस्कोट असलेल्या लाईबची मोठी प्रतिकृती देखील मैदानावर आणण्यात आली.

Marcel
Marcel Dainik Gomantak
Qatar Vs Equador
Qatar Vs Equador Dainik Gomantak

दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध बँड बीटीएस मधील गायक जुंगकॉक याच्या लाईव्ह परफॉर्मन्सवर स्टेडियममधील प्रेक्षक थिरकले. यजमान कतार आणि इक्वाडोर या दोन संघांमध्ये या स्पर्धेतील पहिली लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या पाठिराख्यांनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com