Under 19 World Cup Dainik Gomantak
क्रीडा

Under 19 World Cup: राहुल द्रविडच्या मास्टरप्लॅनने टीम इंडियाला बनवलं चॅम्पियन

भारताचा 19 वर्षांखालील संघ पाचव्यांदा विश्वविजेता ठरला आहे, अंडर 19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संघाने इंग्लंडचा एकतर्फी पराभव करून विजेतेपद पटकावले आहे.

दैनिक गोमन्तक

भारताचा 19 वर्षांखालील संघ पाचव्यांदा विश्वविजेता ठरला आहे, अंडर 19 (Under 19 World Cup) विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संघाने इंग्लंडचा एकतर्फी पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. हा प्रवास संघासाठी सोपा नव्हता, त्यांनाही कोरोनाच्या उद्रेकाचा फटका सहन करावा लागला, असे असतानाही संघाचा विजय झाला. कोरोनाच्या काळात या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी संघ निवडीच्या तयारीचा संपूर्ण मास्टर प्लॅन वरिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी तयार केला होता. द्रविडचा प्लॅन पूर्ण झाला आणि टीम जिंकली.

गेल्या दोन वर्षांत भारताच्या देशांतर्गत क्रिकेटला कोरोनाचा (Corona) फटका बसला. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन होऊ शकले नाहीये. राहुल द्रविडने बैठक घेऊन संघ निवडीचा संपूर्ण आराखडा तयार केला आहे. द्रविड त्यावेळी एनसीएचे अध्यक्ष होते आणि त्यांनी टीम इंडियाचा (Team India) मुख्य प्रशिक्षक बनला नव्हते.

बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष एस शरथ यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना याबाबत माहिती दिली की, राहुल एनसीएमध्ये प्रशिक्षक असताना आम्ही त्यांच्यासोबत बैठक घेतली आणि रोडमॅप तयार केला होता. आम्ही ठरवले की आधी खेळाडूंचा पूल तयार करू, विनू मंकंद ट्रॉफीनंतर आम्ही 90 खेळाडूंची निवड केली. या खेळाडूंची सहा संघांमध्ये विभागणी केली आणि त्यानंतर चॅलेंजर्स मालिका झाली. शरथने पुढे सांगितले की त्यांनी प्रत्येक स्लॉटसाठी दोन खेळाडू निवडले होते आणि त्यांची नजर खासकरून अष्टपैलू खेळाडूंवर होती. विनू मंकंद ट्रॉफीमध्ये खेळू न शकलेल्या अनेक खेळाडूंनी त्यांच्यावर विश्वास दाखवला होता.

निशांत सिद्धूच्या संघाने विनू मंकंद ट्रॉफी जिंकली पण तरीही यश धुलला कर्णधार बनवण्यात आले होते. यामागचे कारण सांगताना शरत म्हणाला, 'निशांत हा अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्यावर आधीच खूप जबाबदारी होती. आम्हाला त्याच्यावर जास्त भार टाकायचा नव्हता. या कारणास्तव यशला कर्णधार बनवण्यात आले, आणि तो फलंदाज होता. यश हा दिल्लीचा असून तो स्ट्रीट स्मार्ट क्रिकेटर आहे, आमचा निर्णय योग्य ठरला. शरत पुढे म्हणाले की, जेव्हा संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला होता. त्याला आशा होती की आयर्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी इतर कोणताही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही जेणेकरून तो 11 खेळाडूंचा संघ उभा करू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

SCROLL FOR NEXT