Umran Malik Bowls Fastest Ball In IPL 2022 Dainik Gomantak
क्रीडा

सनरायझर्स हैदराबादच्या मलिकने IPL 2022 मधील सर्वात वेगवान चेंडू फेकला, मात्र....

उमरानने यापूर्वीही सुमारे 155 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स संघाला भलेही पराभवाचा सामना करावा लागला असेल, परंतु संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात मलिकने ताशी 156.9 किलोमीटर वेगाने चेंडू टाकला. (Umran Malik bowls fastest ball of IPL 2022)

आयपीएल 2022 मधील हा सर्वात वेगवान चेंडू आहे. उमरानने यापूर्वीही सुमारे 155 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे. 22 वर्षीय उमरानचा चेंडू दक्षिण आफ्रिकेच्या एनरिक नॉर्टजेच्या चेंडूपेक्षा 0.7 किलोमीटर प्रतितास वेगवान होता.

उमरान मलिक दिल्लीच्या डावातील शेवटचे ओव्हर करत होता. त्याने षटकाच्या चौथ्या चेंडूवर पूर्ण ताकद लावली आणि ताशी 156.9 किलोमीटर वेगाने चेंडू फेकला. मात्र, त्याचा वेग त्याच्या कामी आला नाही आणि या चेंडूवर पॉवेलने कव्हरवर चौकार मारला. या संपूर्ण सामन्यात मलिकने वेगवान गोलंदाजी केली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात मलिकने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच एका सामन्यात पाच विकेट घेतल्या. त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे हैदराबादने हा सामना जिंकला. मॅच-विनिंग गोलंदाजी केल्यानंतर मलिकने सांगितले होते की, मला ताशी 155 किमीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करायची आहे. या सामन्यात त्याची इच्छा पूर्ण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Update: राज्यात थंडीचा कडाका वाढला, पुढील काही दिवस कसं असेल हवामान? वाचा

Anjuna Illegal Hotel: मुख्‍य सचिवांसह 7 प्रतिवादींना नोटिसा, हणजूण येथील बेकायदा हॉटेल प्रकरणी याचिकेची दखल

गोवा आध्‍यात्‍मिक पर्यटनाचे केंद्र व्हावे, क्लब रात्री 12 नंतर बंद करावेत; दुर्घटना कमी होतील- मंत्री विश्‍‍वजीत राणे

Goa Zilla Panchayat: जिल्हा पंचायतीत 'नारीशक्ती'ला प्राधान्य, उत्तर गोवा हे अध्‍यक्ष, तर 'दक्षिण'साठी उपाध्‍यक्षपद महिलांसाठी राखीव

दुर्घटना घडल्‍यास जबाबदार कोण? दायित्त्‍व नक्‍की करा, उच्‍च न्‍यायालयाचे राज्य सरकारला निर्देश; घेतली स्‍वेच्‍छा दखल

SCROLL FOR NEXT