Umran Malik Dainik Gomantak
क्रीडा

Umran Malik: भारताची तोफ! जम्मू एक्सप्रेसच्या वेगवान चेंडूने रचला इतिहास, पाहा Video

दैनिक गोमन्तक डिजिटल

India vs Sri Lanka: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला पहिल्या टी20 सामन्यात 2 धावांनी पराभूत केले. भारताच्या या विजयात युवा गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका निभावली. दरम्यान, उमरान मलिकने तर चक्क ताशी 155 किमी वेगाने चेंडू टाकत विकेट घेतली होती.

या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर 163 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. पदार्पणवीर शिवम मावीने त्याच्या पहिल्या दोन षटकातच दोन विकेट्स काढल्या होत्या. त्याने एकूण ४ विकेट्स घेतल्या. तसेच हर्षल पटेलनेही 2 विकेट्स घेतल्या. त्यांना उमरान मलिकचीही चांगली साथ मिळाली.

उमरानची तिखट गोलंदाजी

उमरानने या संपूर्ण सामन्यात वेगवान गोलंदाजी केली. त्याने सातत्याने ताशी 145 किमी पेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकले. पण 17व्या षटकातील चौथा चेंडू तर त्याने तब्बल ताशी 155 किमी वेगाने टाकला. त्याच्या या वेगात आलेल्या चेंडूचा सामना श्रीलंकेचा कर्णधार दसून शनकाने केला. पण त्याचा झेल युजवेंद्र चहलने घेतला आणि शनका 45 धावांवर बाद झाला.

दरम्यान उमरानचा हा चेंडू सामन्यातील वेगवान चेंडू ठरला. याबरोबरच तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय गोलंदाजही ठरल्याची चर्चा आहे.

चेंडूतील वेग ही उमरान मलिकची ओळखच बनली आहे. त्याने नोव्हेंबर 2022 मध्ये वनडे पदार्पण करतानाही सातत्याने ताशी 145-150 किमी वेगाने गोलंदाजी केली होती. तसेच गेल्या महिन्यात झालेल्या बांगलादेश दौऱ्यातही त्याचा वेग चर्चेचा विषय होता.

उमरानने मंगळवारी शनका व्यतिरिक्त चरिथ असलंका यालाही बाद केले होते.

भारताचा अखेरच्या चेंडूवर विजय

भारताने दिलेल्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला अखेरच्या षटकात 13 धावांची गरज होती. पण अक्षर पटेलने 10 धावाच या षटकात दिल्याने श्रीलंकेला 20 षटकात सर्वबाद 160 धावाच करता आल्या.

तत्पूर्वी भारताकडून दीपक हुडाने सर्वाधिक नाबाद 41 धावांची खेळी केली, तर अक्षर पटेलने नाबाद ३१ धावांची खेळी केली. या दोघांनी नाबाद 68 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताला 20 षटकात 5 बाद 162 धावा करता आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT