catch Dainik Gomantak
क्रीडा

युगांडाच्या 41 वर्षीय खेळाडूचा झेल पाहून आयसीसीही थक्क

क्रिकेटमधील हा अवघड झेल पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल

दैनिक गोमन्तक

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग बी मध्ये एका खेळाडूने घेतलेला झेल सर्वत्र चांगलाच चर्चेत आला आहे. युगांडाच्या 41 वर्षीय खेळाडूने हा झेल घेतला आहे. तो इतका अप्रतिम आहे की, झेल पाहून क्रिडा रसिक आश्चर्यचकित झाले आहेतच. पण आयसीसीही आश्चर्याने थक्क झाली आहे. एक अनोळखी क्रिकेटपटूने असा आश्चर्यकारक झेल घेतल्याने याची माहिती स्वतः आयसीसीला सोशल मीडियावर द्यावी लागली. ( Uganda s frank Nsubuga takes stunning one handed diving catch against Kenya ICC )

हा प्रकार आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग बी मध्ये घडला, त्यानंतर आयसीसीने या अनोख्या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. खरंतर, रविवारी केनियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान युगांडाच्या फ्रँक न्सुबुगाने एक अवघड झेल घेतला, ज्याचे आता कौतुक होत आहे. या झेलचा व्हिडिओ शेअर करत आयसीसीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एक जबरदस्त झेल जो तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल.

खरं तर, ICC ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की केनियाचा फलंदाज कॉलिन्स ओबुया लेग साइडमध्ये गोलंदाजाविरुद्ध एरियल शॉट मारतो, त्यानंतर लेग साइडचा क्षेत्ररक्षक नसुबुगा झेल घेण्यासाठी त्याच्या मागे धावतो. धावत असताना, 41 वर्षीय युगांडाचा खेळाडू चेंडू जमिनीवर आदळण्यापूर्वी हवेत उडी मारतो आणि त्याच्या हातात पकडतो.

ज्याने हा झेल पाहिला, त्याचे होश उडाले. शेवटी इतका अप्रतिम झेल कोणी कसा काय घेऊ शकतो, हे फलंदाजालाही पटत नाही. हा अप्रतिम झेल घेतल्यानंतर नसुबुगाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तो मैदानावर धावून सेलिब्रेशन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. लोकांनी याला आतापर्यंतचा सर्वात कठीण झेल म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT