IND vs IRE: भारताचा आयर्लंडवर 7 विकेट्सने विजय, वाचा महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर

भारत आणि आयर्लंड यांच्यामधील पहिल्या टी 20 सामन्यात विजय मिळवत भारताने मालिकेतमध्ये 1-0 ची आघाडी घेतली
IND vs IRE
IND vs IREInstagram
Published on
Updated on

भारतीय संघ आज आयर्लंड विरुद्ध पहिला टी 20 सामना खेळला. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली युवा खेळाडूंच्या फौजेने हा दणदणीत विजय मिळवला आहे. पावसामुळे सामना 12 ओव्हर्सचा करण्यात आला होता. यामुळे दोन्ही संघानी प्रत्येकी 12 ओव्हर खेळल्या, ज्यामध्ये आधी आयर्लंडने 108 धावा करत 109 धावांचं आव्हान भारताला दिलं. जे भारताने 9.2 षटकात पूर्ण करत सामना आपल्या नावावर केला आहे. जाणुन घेउया या सामन्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल. (IND vs IRE news)

IND vs IRE 10 महत्त्वाचे मुद्दे पुढिलप्रमाणे:

* सामन्यात भारताने (India) नाणेफेक जिंकत आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर 108 धावांत आयर्लंडला रोखत 109 धावा 9.2 षटकात पूर्ण करत सामना जिंकला.

* सामन्यात भारताच्या दीपक हुडाने उत्तम फलंदाजी केली. पण आयर्लंडच्या हॅरी टेक्टरची ( Harry Tecto) एकहाती झुंजही अप्रतिम होती.

* पहिल्या षटकातचआयर्लंडच्या सलामीवीर कर्णधार अँन्ड्रूला बाद केले.

* त्यानंतर एका मागोमाग एक गडी भारतीय फलंदाज बाद करतच होते. पण हॅरी टेक्टरने एकहाती झुंज देत 64 धावांची तुफान खेळी केली.

* हॅरीच्या याच खेळीच्या जोरावर आयर्लंडने भारतासमोर 109 धावांचे आव्हान ठेवले.

* भारताकडून हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, चहल आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

* 109 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताकडून ईशानने चांगली सुरुवात केली.

* पण 26 धावा करुन तो बाद झाला. क्रेग यंगने त्याला बाद केलं.

* त्यानंतर मात्र हार्दिकने दीपकसोबत मिळून तुफान फलंदाजी केली. हार्दिक 24 धावा करुन बाद झाला.

* पण दीपकने नाबाद 47 धावांची खेळी करत भारताला 9.2 षटकात विजय मिळवून दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com