U19 World Cup Dainik Gomantak
क्रीडा

U19 World Cup: विराटचा युवा खेळाडूंना सल्ला; लवकरच रंगणार भारत इंग्लंड सामना

वर्ल्डकपच्या फायनलपूर्वी विराटने युवा क्रिकेटपटूंशी गप्पा मारल्या.

दैनिक गोमन्तक

ठीक 14 वर्षापुर्वी विराट ज्या स्थितीमध्ये होता त्याच स्थितीमध्ये आज यश धुल असल्याचे त्याला जाणवले आहे. मार्च 2008 मध्ये, 19 वर्षीय कोहली आणि त्याचा युवा संघ जागतिक क्रिकेटच्या शिखरावर पोहोचला होता. त्यावेळी भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. आज कोहली भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार आहे, एक यशस्वी कर्णधार आहे ज्याच्या 20,000 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा झाल्या आहेत. शनिवारी वर्ल्डकपच्या फायनलपूर्वी विराटने युवा क्रिकेटपटूंशी गप्पा मारल्या.

भारत आणि इंग्लंड यांच्यात अंडर-19 विश्वचषक (2022 ICC Under-19 Cricket World Cup) अंतिम सामना होणार आहे. यापूर्वी, भारतीय अंडर-19 स्टार राजवर्धन हंगरगेकर, कौशल तांबे, कॅप्टन धुल आणि इतर अनेकांना विराट कोहलीशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. संपूर्ण संघ झूम कॉलवरती जमला, ज्यामध्ये भारताचे अंडर-19 प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर देखील उपस्थित होते. या क्षणाला बॉईज इन ब्लूने चांगला प्रतिसाद दिला आणि तितकाच आनंद देखील लुटला. काहींनी भारताच्या माजी कर्णधारासोबतच्या संभाषणाचे फोटाज शेअर केले आहेत.

हंगरगेकर यांनी त्यांची इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आणि लिहिले की विराट कोहली भैय्याशी संवाद साधून खूप आनंद झाला. तुमच्याकडून जीवन आणि क्रिकेटबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या ज्या आम्हाला आगामी काळात अधिक चांगले होण्यास मदत करतील. तर फिरकीपटू तांबेने लिहिले की फायनलपूर्वी GOAT कडून काही मौल्यवान टिप्स. मात्र, संभाषणाचा नेमका तपशील समोर आलेला नाही.

अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात ब्लॉकबस्टर सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियावर (Australia) 96 धावांनी विजय मिळवत भारताने सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. भारताने हे विजेतेपद पटकावल्यास ही पाचवी विश्वचषक ट्रॉफी असणार आहे. कोरोनाचा (Corona) फटका बसला असूनही आणि त्यातील काही हाय-प्रोफाइल खेळाडू काही सामन्यांसाठी उपलब्ध नसतानाही, भारतीय कोल्ट्सने स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश करताना एकही सामना गमावला नाहीये.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. टीम इंडियाला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) तीन सामन्यांची मालिका खेळायची आहे. टीम इंडियासाठी वाईट बातमी अशी आहे की सलामीवीर शिखर धवनसह चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळले असून बीसीसीआय (BCCI) उर्वरित खेळाडूंसह मालिका सुरू करण्याच्या तयारीत आहेत. विराट कोहली देखील संघाचा भाग असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT