अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत (U19 World Cup) भारताचा (India U19) प्रवास 15 जानेवारीपासून सुरु होणार आहे. परंतु टीम इंडियाचा सामना करण्याआधीच टूर्नामेंटमध्ये प्रतिस्पर्ध्याला पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. खरंतर, स्पर्धेच्या ग्रुप स्टेजवर भारताचा सामना 3 संघांशी होणार आहे. त्याची पहिली खडतर स्पर्धा दक्षिण आफ्रिकेकडून आहे. दुसऱ्या सामन्यात तो आयर्लंडशी खेळेल, ज्यांच्याविरुद्ध त्याने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे. त्याच वेळी, तिसरा आणि शेवटचा सामना युगांडा (Uganda U19 Team) विरुद्ध होईल. आता भारताविरुद्ध (Team India) लढण्यापूर्वी, या तीनपैकी दोन संघ आपापल्या सराव सामने जिंकून पूर्ण जोमात आहेत. परंतु, युगांडाची स्थिती वाईट आहे. श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात संपूर्ण संघाला मिळून 50 धावाही करता आल्या नाहीत.
दरम्यान, या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 50 षटकांत 8 गडी गमावून 277 धावा केल्या. श्रीलंकेकडून 75 धावा करणाऱ्या सदिशा राजपक्षेशिवाय संघातील इतर कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही झळकावता आले नाही. परंतु संघाच्या 7 फलंदाजांनी निश्चितपणे डबल डिजीट स्कोर मात्र केला.
गोलंदाज ठीक, फलंदाजीत ढेपाळली
युगांडाच्या गोलंदाजांनी या सामन्यात उत्तम गोलंदाजी केली. 5 पैकी 4 गोलंदाज विकेट घेण्यात यशस्वी ठरले. यापैकी 2014 ची इकॉनमीही 5 च्या खाली होती. तसेच श्रीलंकेच्या केवळ एका फलंदाजाने अर्धशतक झळकावल्याने संघाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. 278 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाचा संघ सराव सामन्यात केवळ 46 धावांतच ऑलआऊट झाला. संघासाठी 13 धावा करणारा खेळाडू सर्वाधिक धावा करणारा ठरला. 5 फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. तर इतर उरलेल्या फलदाजांनी 1, 2 किंवा 3 धावा केल्या. परिणामी त्यांना 231 धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
आता भारत शिकार करणार का?
22 जानेवारीला 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या (U-19 World Cup) गटात युगांडाचा सामना भारताशी होणार आहे. दरम्यान श्रीलंकेविरुध्द एवढी वाईट अवस्था झाली असेल तर टीम इंडियाविरुध्द युगांडाची पळता भुई थोडी होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.