Vaibhav Suryavanshi Century Dainik Gomantak
क्रीडा

Vaibhav Suryavanshi Century: 8 सिक्सर, 9 चौकार! अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वैभवचा धमाका, झळकावलं शानदार शतक VIDEO

U19 World Cup 2026 Final: अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या वैभव सूर्यवंशी याने आपल्या फलंदाजीने नवा इतिहास रचला आहे.

Sameer Amunekar

अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या वैभव सूर्यवंशी याने आपल्या फलंदाजीने नवा इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात अवघ्या १४ वर्षीय वैभवने इंग्लिश गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत वैभवने केवळ ५५ चेंडूत आपले झंझावाती शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीमुळे भारताने विश्वविजेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.

वैभव सूर्यवंशी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र्यात पाहायला मिळाला. त्याने मैदानातील प्रत्येक कोपऱ्यात चेंडू टोलवला. वैभवने आधी ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर गिअर बदलत अवघ्या ५५ चेंडूत शंभरी गाठली.

या खेळीत त्याने ९ चौकार आणि ८ गगनभेदी षटकार ठोकले. विशेष म्हणजे, एकाच अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही आता या युवा खेळाडूच्या नावावर जमा झाला आहे.

कर्णधार आयुष म्हात्रेची साथ आणि १४२ धावांची भागीदारी

सलामीला आलेल्या वैभव आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची बहुमोल भागीदारी केली. आयुष म्हात्रेने कर्णधाराला साजेसा खेळ करत ५० चेंडूत ५३ धावांचे योगदान दिले. त्याच्या या खेळीत ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. आयुष बाद झाला असला तरी, त्याने वैभवसोबत मिळून भारतीय डावाला असा वेग दिला की इंग्लंडचे गोलंदाज हतबल झाले.

इंग्लंडची गोलंदाजी ठरली निष्प्रभ

इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय जोडीला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण वैभवच्या बॅटमधून निघणाऱ्या धावांमुळे त्यांचा प्रत्येक प्लॅन फेल ठरला. या दमदार सुरुवातीमुळे भारताने इंग्लंडसमोर डोंगराएवढे आव्हान उभे करण्याची तयारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राहुल गांधींची 'जादूगार' टीपण्णी अन् भाजपचा पलटवार, लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक भिडले; राजनाथ सिंहांची माफीची मागणी

अचानक संकटं येतायेत? राहू-केतूचा अशुभ प्रभाव असू शकतो जबाबदार; वैवाहिक जीवनातील वाद थांबवण्यासाठी शुक्राला करा प्रसन्न

T20 World Cup 2026 Match Fixing: क्रिकेट विश्वात मोठा भूकंप! टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटकडून चौकशी सुरु

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

SCROLL FOR NEXT