Sports Minister of West Bengal Manoj Tiwary Dainik Gomantak
क्रीडा

गोव्यातील क्रीडापटूंच्या संपर्कात तृणमूल

पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री, भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मनोज तिवारी गोव्यात ठाण मांडून बसले

दैनिक गोमन्तक

गोव्यातील (Goa) आगामी निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर युवा मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाने राज्यातील क्रीडापटूंशी (Sports Players) सलगी वाढविण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्‍हणून पश्चिम बंगालचे (West Bengal) क्रीडामंत्री, भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwary) आठवडाभर गोव्यात ठाण मांडून आहेत.

आयपीएलमुळे ते स्वप्नील अस्नोडकर, शदाब जकाती या गोमंतकीय क्रिकेटपटूंना चांगले ओळखतात. दक्षिण गोव्याचे माजी खासदार रमाकांत आंगले यांचे पुत्र गोव्याचे माजी रणजीपटू आदित्य आंगले यांच्याशीही तिवारी यांचा स्नेह असल्याचे सांगितले जाते. या वर्षी सुरवातीस 35 वर्षीय तिवारी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

ते राज्य विधानसभेत आमदार म्हणून निवडूनही आले, नंतर ममता बॅनर्जी यांनी राज्य मंत्रिमंडळात त्यांना क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे राज्यमंत्रीही बनवले. आता गोव्यातील क्रीडापटूंना तृणमूलकडे आकर्षित करण्याचे काम तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे समजते, कितीजण गळाला लागतात हे लवकरच कळेल.

बंगाल व गोव्यातील विशेष साम्य म्हणजे ते फुटबॉल. या दोन्ही राज्यांत हा खेळ खूपच लोकप्रिय आहे. ममता दिदींच्या तृणमूल काँग्रेसने फुटबॉलची मदत घेत ‘खेला होबे’ मोहीम सफल ठरवत पश्चिम बंगालमध्ये भाजपचे कडवे आव्हान यशस्वीपणे परतवून लावले होते.

दरम्यान गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (GFA) वेदांता महिला लीग फुटबॉल स्पर्धेस येत्या सहा ऑक्टोबरपासून सुरवात होत आहेत. आणि विजेतेपदासाठी पाच संघांत चुरस असणार आहे. या स्पर्धेत राज्यातील शंभरपेक्षा जास्त महिला फुटबॉलपटू सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT