Towards winning Jamshedpur Dainik Gomantak
क्रीडा

जमशेदपूर ‘शिल्ड’ जिंकण्याच्या दिशेने

आयएसएल ः सलग सहाव्या विजयासह अग्रस्थान मजबूत, ओडिशाचा धुव्वा

दैनिक गोमन्तक

पणजी ः जमशेदपूर एफसीने आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत सलग सहावा विजय नोंदवत अग्रस्थान मजबूत केले आणि त्याचबरोबर लीग विनर्स शिल्ड जिंकण्याच्या दिशेने कूचही केली. शुक्रवारी बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर त्यांनी अखेरची 17 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळलेल्या ओडिशा एफसीचा 5-1 फरकाने धुव्वा उडवला.

जमशेदपूरच्या विजयात पूर्वार्धातील खेळात नायजेरियन आघाडीपटू डॅनियल चिमा चुक्वू याने तीन मिनिटांत दोन गोल केले. अनुक्रमे 23 व 26व्या मिनिटास गोल नोंदवून या 30 वर्षीय स्ट्रायकरने मोसमातील गोलसंख्या नऊवर नेली. त्यांच्यासाठी तिसरा गोल 54व्या मिनिटास रितविक दास याने केला. 71व्या मिनिटास बदली खेळाडू ऑस्ट्रेलियन जॉर्डन मरे याने जमशेदपूरची आघाडी आणखीनच भक्कम केली. हे दोन्ही गोल स्कॉटलंडचा हुकमी खेळाडू ग्रेग स्टुअर्ट याच्या असिस्टवर झाले. त्याने आता स्पर्धेत सर्वाधिक 10 असिस्टची नोंद केली आहे.

आणखी एक बदली खेळाडू ईशान पंडिता याने 87 व्या मिनिटास जमशेदपूरच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला. 45+1व्या मिनिटास पॉल रांफांगझॉवा याने ओडिशा एफसीची पिछाडी कमी केली होती. 73व्या मिनिटास सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह ब्राझीलियन जोनाथस ख्रिस्तियन याला मैदान सोडावे लागले, त्यामुळे ओडिशा एफसीचा एक खेळाडू कमी झाला.

एकंदरीत जमशेदपूरचा (Jamshedpur) हा 19 लढतीतील 12वा विजय ठरला. त्यांचे आता 40 गुण झाले असून दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानवर तीन गुणांची आघाडी मिळविली आहे. सात मार्च रोजी स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना एटीके मोहन बागान व जमशेदपूर एफसी यांच्यात होईल. ती लढत शिल्ड विजेतेपदासह एएफसी चँपियन्स लीग पात्रतेसाठीही निर्णायक ठरेल. ओडिशा (Odisha) एफसीला 20 लढतीत नववा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 23 गुणांसह ते सातव्या क्रमांकावर कायम राहिले व त्यांची मोहीमही संपली.

मुंबई सिटीचे भवितव्य हैदराबादच्या हाती

गतविजेत्या मुंबई सिटीचे आठव्या आयएसएल (ISL) स्पर्धेतील भवितव्य हैदराबाद एफसी ठरविणार आहे. उभय संघांतील सामना शनिवारी (ता. 5) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होईल. या लढतीत विजय नोंदविला तरच मुंबई सिटीला उपांत्य फेरीच्या आशा असतील. 19 लढतीतून 35 गुण नोंदविलेल्या हैदराबादने प्ले-ऑफ फेरीतील जागा यापूर्वीच निश्चित केली आहे. मुंबई सिटीचे सध्या 19 लढतीतून 31 गुण आहेत.

ते पाचव्या स्थानी असून 33 गुणांसह केरळा ब्लास्टर्स चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई सिटीने शनिवारी हैदराबादला नमविले तर त्यांचे 34 गुण होतील, तरीही त्यांना केरळा ब्लास्टर्सच्या रविवारी एफसी गोवाविरुद्ध (goa) होणाऱ्या सामन्यापर्यंत थांबावे लागेल. केरळा ब्लास्टर्सने एफसी गोवास नमविले, तर मुंबई सिटीस आगेकूच राखता येणार नाही. हैदराबादविरुद्ध (Hyderabad) निकाल पराभव किंवा बरोबरी ठरला, तर शनिवारीच मुंबई सिटीचे आव्हान संपुष्टात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

SCROLL FOR NEXT