टोकियो ऑलिंपिकला जाणाऱ्या खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला.  Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympics: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंचे वाढविले मनोबल

भारतातून 18 खेळात एकूण 126 खेळाडू ऑलिंपिकसाठी जाणार आहेत. भारत आतापर्यंतच्या ऑलिंपिकमधील सर्वात मोठा संघ टोकियो ऑलिंपिकसाठी पाठवित आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: टोकियो ऑलिंपिकला (Tokyo Olympics) जाणाऱ्या खेळाडूंशी (Players) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज संवाद साधला. टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताचे एकूण 126 खेळाडू सहभागी होणार आहेत. या संवादातून पंतप्रधानांनी काही खेळाडूंशी चर्चा करत त्यांचे मनोबल वाढविले आणि सर्वांना ऑलिंपिकसाठी शुभेच्छा दिल्या. यात महाराष्ट्राचा तिरंदाजीतील खेळाडू प्रविण जाधव या मराठमोळ्या खेळाडूंच्या कुटुंबियांशी पंतप्रधानांनी मराठीतून संवाद साधला. तुमची तब्बेत कशी आहे असे पंतप्रधानांनी जाधव कुटुंबियांना विचारले. बॉक्सर अशिश कुमार याने काहिदिवसांपूर्वीच कोरोनामुळे आपल्या वडिलांना गमाविले आहे. त्या दुख:तून बाहेर येत त्याने ऑलिंपिकसाठी मेहनत केली आहे. त्याचे देखील कौतुक करत पंतप्रधान मोदींनी त्याचा आत्मविश्वास वाढविला.

23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिंपिकचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतातून 18 खेळात एकूण 126 खेळाडू ऑलिंपिकसाठी जाणार आहेत. भारत आतापर्यंतच्या ऑलिंपिकमधील सर्वात मोठा संघ टोकियो ऑलिंपिकसाठी पाठवित आहे. ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या अनेक खेळाडूंकडे चाहत्यांच्या नजरा आहेत. यात भारताकडून पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या रेसलर भवानी देवी, नेथरा कुमानन नौकायान, साजन प्रकाश आणि श्रीहरी नटराज या खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष्य असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT