Tokyo Olympics: Neeraj Chopra clinches India's first gold medal Dainik Gomantak
क्रीडा

Olympics 2020: भारताला नीरजने दिले पहिले सुवर्ण पदक; तर बजरंगाने सुद्धा केली कमाल

दुखापतग्रस्त असूनही पूनियाने या सामन्यात कांस्य पदक मिळवल्याने त्याने अनेकांची मनं जिंकली आहेत.

दैनिक गोमन्तक

ऑलिम्पिकमध्ये (Olympic) भारताने आज सुवर्ण पदकावर यशस्वीरित्या नाव कोरले. भारताने एकूण दोन पदकं जिंकत उत्तम कामगिरी केल्याचे पहायला मिळाले आहे. भालाफेक मध्ये नीरज चोप्राने दमदार कामगिरी करत पहिल्याच प्रयत्नात 87.03 अशी उत्तम भालाफेक केला. तर दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा 87.58 असा विक्रमी भाला फेकला आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तर दुसरीकडे प्रसिद्ध कुस्तीपटू बजरंग पुनियाने देखील भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे. बजरंगने कझाकिस्तानच्या दौलत नियाजबेकोव्हचा 8-0 ने पराभव केला. (Tokyo Olympics: Neeraj Chopra clinches India's first gold medal)

विशेष म्हणजे बजरंग पुनिया हा आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. मात्र, गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला आक्रमक कुस्ती खेळता आली नाही. दुखापत असूनही पुनियाने या सामन्यात कांस्य पदक मिळवत त्याने अनेक क्रिडाप्रेमींची मनं जिंकली आहेत.

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन्ही देश समोर-समोर उभे ठाकले की टशन येतेच. दोन्हीकडील फॅन्स आपल्या खेळाडूंना आगदी मनापासून चेअर करतात. शनिवारी या दोघांमध्ये अशीच टशन पहावयास मिळाली आहे. ती म्हणजे, टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेक (Javelin throw final ) या प्रकारात अंतिम सामन्यात भारताचा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम (Arshad Nadeem) हे दोघे जण भिडले आणि नीरजने विक्रमी कामगिरी करत सुवर्ण पदक मिळवले आहे.

ग्रुप स्टेजमध्ये या दोघांनी आपआपल्या गटात जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रानं 86.65 मीटर भालाफेक करत पहिला क्रमांक पटकावला. तर अर्शदनं 85.16 मीटर भाला फेक करत तिसरा क्रमांक मिळविला आहे. नीरज ग्रुप ए मध्ये तर अर्शद ग्रुप बी मध्ये होता..

भारताला एथलेटिक्समध्ये आजवर एकदाही ऑलिम्पिक मेडल मिळालेलं नाही. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांचे ब्रॉन्झ मेडल सेकंदापेक्षाही कमी अंतराने हुकले होते. त्यामुळे एथलेटिक्समध्ये पदकाचा हाच दुष्काळ नीरज यंदा सुवर्ण पदक घेऊनच संपवेल अशी देशाला आशा आहे. तसेच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून टोकियो ऑलिंपिकमध्ये निरज पहिले सुवर्ण पदक भारतासाठी घेऊन येईल अशी आशा सर्वच भारतीयांना आहे. यापूर्वी एशियन गेम्समध्ये नीरजनं गोल्ड तर अर्शदनं ब्रॉन्झ मेडल मिळवले होते.

अर्शदला खरेतर क्रिकेटमध्ये करिअर करायचे होते. परंतु नीरजचा खेळ पाहून त्याने भालाफेकीक येण्याचा निर्णय घेतला. 2018 साली एशियन गेम्समध्ये त्याने ब्रॉन्झ मेडल पटकाविले होते. त्यानंतर त्याने हे सांगितले होते. या दोघांना जर्मनीच्या जोहानेस वेटरचे कडवे आव्हान असेल. त्याने 85.64 मीटर भालाफेक करत दुसऱ्या क्रमांकासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT