Mary Kom & Manpreet Singh Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympic: मेरी कोम आणि मनप्रीत सिंग भारताचे असणार ध्वजवाहक

मेरी 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरली नव्हती.

दैनिक गोमन्तक

आगामी काळात टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympic) उद्घाटन सोहळ्यासाठी बॉक्सिंगपटू मेरी कोम (Mary Kom) आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग (Manpreet Singh) यांना 200 भारतीय सदस्यीय पथकाचे ध्वजवाहक बनवण्यात आले आहे. सहा वेळा विश्ववेजेती ठरलेली मेरी कोम तिच्या दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार आहे.

मेरी 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरली नव्हती. मात्र 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते. 2014 च्या आशियाई खेळांमध्ये तिने सुवर्ण तर 2022 मध्ये रौप्यपदक जिंकले होते. 28 वर्षीय मनप्रीत त्याच्या तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे.

2016 पासून तो भारतीय हॉकी संघाचा कर्णधार आहे. 2014 च्या इंचेऑन आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy) दोन रौप्यपदक पटकावणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. कुस्तीपटू बजरंग पुनिया 8 ऑगस्टला होणाऱ्या समापन समारंभसाठी भारतीय पथकाचा तो ध्वजवाहक असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT