टोकियो ऑलिंपिक
टोकियो ऑलिंपिक दैनिक गोमन्तक
क्रीडा

Olympics : खेळाडूने 72 ते 96 तास आधी कोरोना अहवाल अपलोड करणे गरजेचे

team dainik gomantak

टोकियो ऑलिंपिक (Tokyo Olympics) स्पर्धेला जाण्यापूर्वी भारतीय अ‍ॅथलेटस् ना 98 ते 72 तासांचा कोरोना निगेटीव्ह अहवाल (corona report)अपलोड करणे आवश्यक आहे. अशी माहिती मंडळाचे प्रतिनिधी उप संचालक डी. मिशन (De Mission), आणि डॉ. प्रेम वर्मा (Dr. Prem Verma) यांनी दिली आहे. हा कोरोनाचा रिपोर्ट सरकार मान्यता प्राप्त लॅबमधील (Lab) असावा आणि तो खेळाच्या आयोजन समितीनुसार अपलोड करावा असे डॉ. वर्मा यांनी सांगितले आहे. या अधिकृत लॅब जपानच्या दुतावासाशी जोडण्यात आलेल्या आहेत. (Tokyo Olympics: Athletes need to upload a corona report 72 to 96 hours in advance)

सध्या भारतीय अ‍ॅथलेटस् जेथे सराव करीत आहेत. तेथे त्यांच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. त्याच लॅबला खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यास मान्यता देण्यात यावी अशी मागणी स्पोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडीयाने (SAI) इंडियन ऑलिंपिक असोसिऐशनकडे (IOA) केली आहे. त्यामुळे चाचण्यांचे अहवाल अपलोड करणे किंवा एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाण्याची आवश्यकता भासणार नाही. खेळूने फक्त शरिरिक फिटनेचा रेकॉर्ड ठेवणे अनिवार्य आहे. असे एसएआयकडून (SAI) सांगण्यात आले आहे.

टोकियोला जाण्यापूर्वी खेळडूने 14 दिवसांच्या आपल्या आरोग्याच्या नोंदी मोबाईल अ‍ॅपवर 7 दिवसांच्या आत अपलोड कराव्यात. तर कोरोना रिपोर्ट जपानला जाण्याआधी 96 ते 72 तास अपलोड करावा. अहवाल एकदा अपलोड झाल्यानंतर तो इमिग्रेशन ऑफिसमध्ये जाऊन तेथे एक क्यूआर कोड जनरेट होईल. तो अ‍ॅथलेटस् च्या मोबाईलवर येईल. तो खेळडू जपान मधील विमानतळावर पोहोचल्यावर त्याच्या क्यूआर कोडची तापसणी करुन त्याला सोडण्यात येईल.

वर्मा म्हणाल्या, "मी काल ओसीला एक ईमेल पाठविला असून त्यात मी पटियाला, सोनेपत, दिल्ली, पुणे, हैदराबाद आणि कोलकाता येथे आणखी दोन तसेच गुवाहाटी, लखनऊ, नागपूर आणि चेन्नई येथे प्रत्येकी एक प्रयोगशाळा मंजूर करण्याची मागणी केली आहे. जपान सरकारने कोरोना नियंत्रणाचा एक भाग म्हणून ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या 11 देशांना 3 दिवसांचे विलगीकरण अनिवार्य केले आहे. यात खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांचा समावेश असेल.

एखाद्या खेळाडूकडे स्मार्ट फोन नसेल किंवा त्याने सोबत आणला नसेल तर त्याच्याकडून कोरोना चाचणीच्या तपशीलासह एक फॉर्म भरुन घेण्यात येईल. त्या खेळाडूची ७ दिवस तपासणी करुन त्याच्या कोरोना अहवालासह त्याचा पुन्हा एक फॉर्म भरुन घेण्यात येईल. आणि त्याची सर्व माहिती कोरोना अधिकाऱ्यांना देऊन पोर्टलवर अपलोड करण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT