Toshiro Muto Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympic: स्पर्धा अखेरच्या क्षणी रद्द होऊ शकतात- मुटो

गरज पडल्यास आम्ही तशी इतर संयोजकांशी चर्चा करु, असं मुटो (Toshiro Muto) यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid 19) पुन्हा एकदा वाढू लागला असताना दुसरीकडे ऑलिम्पिक संयोजकासमोर वाढती रुग्णसंख्या हे मोठं आव्हान आहे. अशा परिस्थीतीमध्ये अखेरच्या क्षणी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो, अशी शक्यता टोकियो ऑलिम्पिक संयोजन समितीचे प्रमुख तोशिरो मुटो (Toshiro Muto) यांनी व्यक्त केली आहे. शुक्रवारी ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. आम्ही कोरोनाच्या परिस्थीतीवर लक्ष ठेवून आहोत. कोरोना रुग्णांची संख्या प्रकर्षाने वाढतच गेली तर स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. गरज पडल्यास आम्ही तशी इतर संयोजकांशी चर्चा करु, असं मुटो यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्वभूमीवर असा निर्णय घेण्यात येऊ शकतो यावर आम्ही सहमत आहोत. आता असाच कोरोनाचा संसर्ग वाढत राहिल्य़ास आम्ही पुन्हा एकदा बैठक बोलावून चर्चा करु.अर्थात रुग्णसंख्या वाढली तर आवश्य चर्चा होईल, असंही मुटो यांनी सांगितले. पत्रकार परिषदेनंतर टोकियो स्पर्धेचे प्रवक्त्यांनी सांगितले की, संयोजक या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही स्पर्धा पुन्हा नव्याने होत असली तरी कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. स्पर्धा प्रेक्षकांशिवाय होणार आहे. या वेळी जपानमध्ये आणिबाणी जाहीर करण्यात आली आहे. ज्यांना ऑलिम्पिक स्पर्धाससांठी अधिस्वीकृती देण्यात आली अशा 67 व्यक्ती आत्तापर्यंत कोरोना चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत. जपानमध्ये आत्तापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 8 लाख 40 हजार झाली आहे. यामधील 15 हजार 55 जणांचे मृत्यू झाले आहेत. यंदाच्या ऑलिम्पिकचे यजमान असलेल्या टोकियो शहरामध्ये मंगळवारी 1387 रुग्ण आढळले आहेत.

यानंतरही ऑलिम्पिक समिती या स्पर्धा घेण्यालवर ठाम आहे. ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यासाठी ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश (Thomas Bash) यांनी घोषणा केलेली नाही. स्पर्धा यशस्वी आणि सुरक्षित पार पाडण्याची खात्री बाळगा असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. ऑलिम्पिक स्पर्धांना आम्ही जपानमध्ये लोकप्रियता देऊ शकलो नाही याबाबत माफी मागताना ऑलिम्पिक संयोजन समितीच्या अध्यक्षा सेईको हाशिमोटो (Seiko Hashimoto) यावेळी म्हणाल्या. कोरोनाच्य वाढत्या प्रादुर्भावामुळे जपानी लोक निराश झाले आहेत. त्यांच्या मनातील भिती अजूनही गेलेली नाही. त्यामुळे त्यांचा ऑलिम्पिककडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मी अगदी खुल्या मनाने तुमची सर्वांची माफी मागतो. ऑलिम्पिक स्पर्धा सुरक्षित आणि आरोग्यदायक पार पडेल यासाठी सर्व काळजी घेतली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT