कोरोनाच्या पाश्वभूमीवर (Covid 19) टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे (Tokyo Olympic) आयोजन करण्यात येत आहे. यातच आता अॅथलीट्सना (Athletics) दुसऱ्या खेळाडूसोबतची जवळिकता टाळण्यासाठी पुठ्ठ्या पासून बनवण्यात आलेल्या ‘Anti-Sex’ बेड्स देण्यात येणार आहेत, असं पॉल चेलीमोने (Paul Chelimone) यांनी सोशल मिडियावरील ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. पॉल चेलिमोने त्यांच्या ट्विटर थ्रेडमध्ये याला जवळिक टाळण्याच्या हेतूने हा झोपेचा सेटअप बनवला असल्याचं सांगितलं आहे. यावर मात्र नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. आणि बऱ्याचजणांनी या गोष्टीला विचित्रही म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी या गोष्टीचे समर्थनही केले आहे. जपानमधील टोकियोमध्ये करण्यात आले आहे. टोकियोमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे या भन्नाट कल्पनेमुळे सोशल डिस्टिंन्सिंगच्या पालनाला प्रोत्साहन मिळणार आहे. म्हणूनच या बेड्सची स्थापना केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
नेमकं ट्विट आहे तरी काय ?
टोकियो ऑलिम्पिकच्या गावामध्ये बसविण्यात येणारे बेड्स पुठ्ठ्यापासून बनवले जातील, अॅथलीट्समधील जवळीकता टाळणे हा मूळ उद्देश आहे. खेळापलिकडे असलेल्या परिस्थितीमध्ये टाळण्यासाठी बेड्स एकाच व्यक्तिचे वजन सहन करण्यास सक्षम असतील.पॉल चेलीमोने यांनी बेड्सचे चित्र शेअर करत लिहिले आहे, ''या क्षणी मला खाली जमिनीवर झोपायचे कसे याचा सराव करावा लागणार आहे. कारण जर माझा बेड अचानक कोसळला तर मला जमीनीवर झोपायचं कस याचं प्रशिक्षण नाही.''
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया !
चेलीमोने यांच्या सोशल मिडियावरील ट्विटने लवकरच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या विचित्र संकल्पनेचे नेटकऱ्यांना आश्चर्य वाटले. तर काही नेटकऱ्यांनी कोरोनाच्या संसर्गापासून अॅथलीट्स यांचा बचाव करण्यासाठी अशा बेड्सचे नियोजन करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्याने म्हटले की, हे शुध्द मूर्खपणा आहे ते प्रोढ आहे ते हवं ते करु शकतात. शिवाय कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला खरोखरच या सर्व गोष्टींचा सामना करावा लागणार असेल तर आपल्याकडे गेम्स का आहेत ? तर काहीं नेटकऱ्यांनी त्याच्या प्रतिक्रियेला दाद दिली. तर तिसऱ्याने ही संकल्पना योग्य आहे आणि पुर्वापरयोग्य ऑलिम्पिक खेडे उभारण्याचा हा योग्य मार्ग असल्याचे म्हटले आहे.
160,000 कंडोमसाठी कंपन्यांबरोबर करार !
टोकियो ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये सहभागी खेळाडूंसाठी 160,000 कंडोम देण्याच्या हेतून चार कंडोम कंपन्यांशी करार करण्यात आला आहे. आयोजकांनी माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, कंडोम वाटप अॅथलीट्सच्या व्हिलेजमध्ये नाही तर आपल्या बरोबर मायदेशी घेऊन जाण्यासाठी आणि त्यासंबंधी जागरुकता करण्यासाठी हे कंडोम देण्यात येणार आहेत.
गेम्सनंतर बेड्सचा पुनर्वापर
टोकियोमध्ये गेम्सनंतर ह्या बेड्ससाठी वापरल्या गेलेल्या पुठ्ठ्याच्या कागदाच्या उत्पादनांमध्ये पुनर्वापर करण्यात येणार आहे. हे पुठ्ठ्यापासून बनविण्यात येणारे बेड्स 200 किलोग्रॅम वजनाचा भर पेलू शकतात असे सांगण्यात जानेवारी 2020 मध्ये पहिल्यांदा हे बेड्स बनवण्यात आले. सोशल डिस्टिन्सिंगच्या कल्पनेला प्रोत्साहन देणे हा त्यामागचा हेतू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.