Katya Coelho Instagram
क्रीडा

Katya Coelho: गोव्याची सुवर्णकन्या म्हणते, '...म्हणून सरकारची मदत गरजेचीच'

गोव्याची कात्या कोएल्हो एशियन गेम्स 2023 साठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला वाइंडसर्फर ठरली आहे.

Pranali Kodre

Katya Coelho: गोव्याची कात्या कोएल्होने सोमवारी मोठा इतिहास रचला आहे. ती आगामी एशियन गेम्समधील वाइंडसर्फिंग नौकायानाच्या आयक्यू फॉईल स्पर्धेसाठी पात्र ठरणारी भारताची पहिली महिला सर्फर ठरली आहे. तिने हे यश मिळवल्यानंतर म्हटले आहे की तिला सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.

सोमवारी कात्याने मुंबईत झालेल्या सेल इंडिया चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत महिला विभागात थर्ड ट्रायलमध्ये सुवर्णपदक जिंकले. यासह तिने एशियन गेम्ससाठी पात्रता मिळवली आहे. या चॅम्पियनशीप स्पर्धेत तिच्यासह एकूण 199 सर्फर सहभागी झाले होते.

या यशानंतर तिने सांगितले आहे की एशियन गेम्समध्ये स्पर्धा करण्यासाठी योग्य ट्रेनिंग मिळणे गरजेचे असून त्यासाठी एखादा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक नेमणे आवश्यक आहे. यासाठी तिला सरकारकडून मदतीची गरज आहे. तिने असेही सांगितले की महिला खेळाडूंच्या अधिकाधिक गरजांवर लक्ष द्यायला हवे आणि हा क्रीडाप्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठीही सरकारने त्यावर काम करायला हवे.

कात्याला तिच्या वडीलांनी या सर्फिंगसाठी प्रशिक्षण दिले आहे. तिचे वडीलही प्रशिक्षक आहेत. वाइंडसर्फिंग महगडा क्रीडाप्रकार आहे, त्याचमुळे कात्याचे म्हणणे आहे की आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक नेमण्यासाठी तिला सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.

दरम्यान, तिने तिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तिने म्हटले आहे की 'माझ्या कारकिर्दीतील हा मोठा क्षण आहे की मी इतक्या मोठ्या स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार आहे.'

त्याचबरोबर ती पुढे म्हणाली, 'माझे लक्ष्य सुवर्णपदक जिंकणे हेच आहे. भारतामध्ये नवीन खेळांना मान्यता मिळाली असल्याने आणि चाहत्यांकडून प्रेम आणि पाठिंबा मिळत असल्याने आणखी खेळाडू पुढे येताना आणि आपल्या देशाचा गौरव वाढवताना आपण पाहू शकू.”

कात्याने यापूर्वीही मोठे यश मिळवले आहे. तिने 2015 साली एशियन ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन पदके जिंकली होती. तसेच तिने यॉटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच ती 2014 साली युथ ऑलिम्पिक्समध्ये सहभागी झालेली एकमेव भारतीय महिला वाईंडसर्फर होती.

आता कात्या 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT