Young Players Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: आयपीएल लिलावात तरुण खेळाडूंचा 'जलवा', जाणून घ्या तरुण खेळाडू

बेंगळुरुमध्ये (Bangalore) पार पडलेल्या दोन दिवसीय लिलावात देशभरातील आणि जगभरातील 500 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 (IPL 2022) चा मेगा लिलाव रविवारी रात्री उशिरा संपला. बेंगळुरुमध्ये पार पडलेल्या दोन दिवसीय लिलावात देशभरातील आणि जगभरातील 500 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता, परंतु शेवटी फक्त 204 खेळाडूंनाच फ्रँचायझींनी घेतले. विशेष म्हणजे त्यापैकी 11 खेळाडूंवर 10 कोटी किंवा त्याहून अधिकची बोली लागली. यादरम्यान अनेक संघांनी तरुण खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. चला तर मगं लिलावात विकल्या गेलेल्या पाच युवा खेळाडूंबद्दल जाणून घेऊया... (These Are The Five Youngest Players Of IPL 2022)

नूर अहमद : 17 वर्षे 42 दिवस

अफगाणिस्तानचा (Afghanistan) नूर अहमद (Noor Ahmad) हा युवा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. या लिलावात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) 30 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले. यासह 17 वर्षे 42 दिवसांचा नूर अहमद यंदाच्या लिलावात विकला जाणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे.

डेवाल्ड ब्रेविस: 18 वर्षे 291 दिवस

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) युवा क्रिकेटपटू आणि बेबी एबी या नावाने प्रसिद्ध असलेला डेवाल्ड ब्रेव्हिस (David Brevis) हा यावेळचा दुसरा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. 18 वर्षीय ब्रेविसला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याच्या 20 लाखांच्या मूळ किमतीच्या 15 पट रक्कम दिली आहे. ब्रेव्हिस उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करतो. ब्रेव्हिसने यावर्षी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत 500 हून अधिक धावा केल्या. विशेष त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले आहे. या काळात त्याने दोन शतके आणि एक अर्धशतकही झळकावले आहे.

अनिश्वर गौतम : 19 वर्षे 29 दिवस

अनिश्वर गौतमला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याच्या 20 लाखांची बेस प्राइस देऊन आपल्या संघात घेतले. अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेला अनिश्वर 19 वर्ष 29 दिवसांचा आहे. कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू अनिश्वर डाव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करतो.

राज बावा : 19 वर्षे 94 दिवस

हिमाचल प्रदेशचा युवा क्रिकेटपटू राज अंगद बावा (Raj Angad Bawa) याने नुकतेच अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत शानदार कामगिरी केली. त्याने आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांना अचंबित केले. या 19 वर्षीय अष्टपैलू खेळाडूला पंजाब किंग्जने दोन कोटींमध्ये खरेदी केले. बावाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने फायनलमध्ये 162 धावांची नाबाद इनिंग खेळली आणि पाच विकेट्स घेतल्या.

यश ढुल : 19 वर्षे 55 दिवस

अंडर-19 विश्वचषक (Under-19 World Cup) जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार यश ढुल याला दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) विकत घेतले. ढुलने नुकतंच विश्वचषकात शानदार फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले. त्याला त्याच्या 20 लाखांच्या मूळ किमतीच्या बदल्यात 50 लाख रुपये मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT