IPL auction 2022: U-19 'हा' खेळाडू CSK ला विकला 1.5 कोटींना

मुंबई इंडियन्सनेही या खेळाडूसाठी बोली लावली होती, पण यश चेन्नई ला आले.
Rajvardhan Hangargekar
Rajvardhan HangargekarDainik Gomantak
Published on
Updated on

नुकत्याच वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या ICC अंडर-19 (Under19) विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य असलेल्या राजवर्धन हंगरगेकरला त्याचा पहिला IPL संघ मिळाला आहे. IPL-2022 मेगा लिलाव झाला. या गोलंदाजाने त्याची मूळ किंमत 30 लाख ठेवली होती. या खेळाडुला चार वेळा विजेता ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) विकत घेतले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील या संघाने राजवर्धनला 1.50 कोटींना विकत घेतले. मुंबई इंडियन्सनेही या खेळाडूसाठी बोली लावली होती, पण यश चेन्नई ला आले. मुंबईने राजवर्धनसाठी सर्वप्रथम बोली लावली. त्यानंतर लखनौ सुपरजायंट्सने एंट्री केली तर विजय मात्र चेन्नईच्या संघाला मिळवला.

Rajvardhan Hangargekar
AUS vs PAK: वैयक्तिक आयुष्यातील आनंदाचा त्याग करून ख्वाजा जाणार पाकिस्तान दौऱ्यावर

असा राहिला विश्वचषकाचा प्रवास

अंडर-19 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात राजवर्धनने 38 धावांत एक विकेट घेतली होती. यानंतर आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामण्यात त्याने 17 धावांत एक विकेट घेतली आणि नाबाद 39 धावा केल्या. युगांडाविरुद्ध त्याने आठ धावांत दोन बळी घेतले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने बांगलादेशच्या एका फलंदाजाला बाद केले. मात्र उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) त्याला एकही विकेट घेता आली नाही. तर फायनलमध्येही त्याला इंग्लंडविरुद्ध एकही विकेट मिळाली नव्हती.(CSK sold under-19 Rajwardhan Hungargekar for Rs 1.5 crore)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com