मोरजी मैदान  Dainik Gomantak
क्रीडा

Goa: गावागावात क्रीडा मैदानाच्या सुविधा नाही

गावागावात क्रीडा मैदाने नसल्याने आजही क्रीडा प्रेमीना गावातील शेतात मोकळ्या जागेत क्रीडा स्पर्धा आयोजित करून नवीन खेळाडू तयार करण्यासाठी धडपड करावी लागते .

निवृत्ती शिरोडकर

Goa: राष्ट्रीय खेळ स्पर्धेच्या निमित्ताने का होईना पेडणे तालुक्यात सर्वाधिक खर्च करून पेडणे सावळवाडा येथे ३५ कोटी रुपये खर्च करून इंडोर स्टेडीयम क्रीडा मंत्री बाबू आजगावकर यांनी उभारला तो प्रकल्प आता कोरोना सेंटर म्हणून कार्यरत आहे .पेडणे तालुक्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक जास्तखर्च करून पेडणे पालिका क्षेत्रात हा इंडोर स्टेडीयम सुसज्य तयार केलेले आहे राष्ट्रीय खेळामुळे हा भव्य प्रकल्प उभारण्यात आला आहे .क्रीडा खात्याने गावागावातील क्रीडा मैदाने (playground facilities) क्रीडा संकुलाकडे राष्ट्रीय खेळामुळे राज्यात साधनसुविधा नवीन क्रीडा संकुले उभारण्यासाठी भर दिला .आणि लगेच कोरोना महामारीचे संकट देशात पर्यायाने जगावर आले .

आता राष्ट्रीय खेळ खेळवण्यास किती विलंब होईल हे सांगता येत नाही, हे मैदान पेडणे शहराची शान वाढवत आहे . यापूर्वीच्या क्रीडा मंत्र्याने कधीच पेडणे तालुक्यातील क्रीडा मैदाने तेथील साधन सुविधा यावर लक्ष दिले नाही . मात्र मागच्या दहा वर्षापूर्वी क्रीडा मंत्री म्हणून बाबू आजगावकर झाले त्यावेळी त्यांनी प्रथम धारगळ येथे क्रीडा नगरीसाठी जागा संपादित केली . मात्र त्याठिकाणी क्रीडा नगरी उभारण्यास त्याना यश आले नाही , आता त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारण्यासाठी क्रीडा मंत्री बाबू आजगावकर कार्यरत आहेत आणि ते वारंवार आपल्या भाषणात उल्लेख करतात .

नेशनल स्पर्धा मागच्या काही वर्षापासून पुढे ढकलण्यात आल्या आहेत ,मागच्या ७ वर्षापूर्वी क्रीडा मंत्री रमेश तळवडकर मंत्री असताना सावळवाडा पेडणे येथील मैदानाचा विकास करण्याचा आराखडा तयार केला होता त्या आराखड्यात तत्कालीन क्रीडा मंत्री रमेश तलवडकर आणि तत्कालीन मंत्री राजेंद्र आर्लेकर आदींनी या मैदानाचा विकास करताना जलतरण तलाव उभारण्याचे आश्वासन दिले होते . मात्र या ठिकाणी आता उभारण्यात आलेला नाही .

मोरजी मैदान स्थिती

राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने का होईना शेवटी पेडणे तालुक्यासाठी सुसज्य न भूतो न भविष्यती असा इंडोर स्टेडीयम मिळाले आहे ,आमदार , मंत्री क्रीडा मंत्री सरकार बदलतील मात्र हि साधन सुविधा मात्र पेडणे तालुक्यात कायमस्वरूपी खेळासाठी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत .

क्रीडा मंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे संपर्क साधला असता राष्ट्रीय खेळासाठी राज्यात ठिकठीकाणी करोडो रुपये खर्च करून मैदानाचा विकास साधनसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत त्याचा एक भाग म्हणून पेडणे सावळवाडा येथे इंडोर स्टेडीयम उभारलेले आहे

या मैदानाचा वापर पेडणे तालुक्यातील सर्व क्रिकेट क्लब , फुटबॉल क्लब , कबड्डी संघाने त्याचा वापर करावा .जास्तीत जास्त खेळाडूनी वापर करताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याचे आवाहन करून एकदा राष्ट्रीय स्पर्धा यशस्वी झाली कि गावागावातील क्रीडा मैदानाकडे लक्ष देणार शिवाय धारगळ येथील क्रिकेट स्टेडीयम उभारण्यासाठी जोरदार प्रयज्ञ केले जातील असे त्यांनी सांगितले . पेडणे तालुक्यासाठी तत्कालीन क्रीडा मंत्री आणि आताचे मंत्री बाबू आजगावकर यांनी कॉंग्रेस पक्षात असताना धारगळ येथे क्रीडा नगरी उभारण्यासाठी ९ लाख चौरस मीटर जमीन संपादित केली होती , मात्र गावागावातील क्रीडांगणे त्यांचा विकास करण्यास सरकारला वेळ नव्हता , क्रीडा प्रेमी आणि नागरिकांनी वेळोवेळी क्रीडा नगरी एवजी अगोदर गावागावात मैदाने उभारून क्रीडा प्रेमींची सोय करावी अशी मागणी केली जात होती मात्र सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केलेले आहे .

पेडणे तालुक्यात एकूण वीस ग्रामपंचायती आणि एक पेडणे नगरपालिका आहे , या भागातील क्रीडा प्रेमींनी राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर आपली कारकीर्द यशस्वी केली , कला गुणाना वाव मिळवून देण्यासाठी पेडणे तालुक्यात आवश्यक त्या सोयी सुविधा आजही उपलब्ध नाही .

धारगळ येथे आता तर क्रीडा मंत्री क्रीडा नगरीच्या जागेत भव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान उभारण्यासाठी धावपळ करत आहे मात्र गावातील जी क्रीडांगणे आहेत त्याची दुरुस्ती करण्यावर भर दिला जात नाही , नवीन क्रीडांगणे उभारण्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया केली जात नाही .

सध्या पेडणे तालुक्यात मोरजी , मांद्रे , कोरगाव , चोपडे ,वारखंड पेडणे , तुये या ठिकाणी क्रीडा मैदाने आहेत . पेडणे सावळ वाडा येथील मैदानाचे पुनर्बांधणी ३२ कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय खेळासाठी तयार केले आहे . क्रीडा मंत्र्यांचे लक्ष केवळ राष्ट्रीय खेळाकडे होते . त्यामुळे कोणत्या गावात कोणते मैदान आहे व त्याची स्थिती काय आहे याची माहिती क्रीडा मंत्र्याना नाही गावातील क्रीडा मैदानाची स्थिती नाजूक आहे . त्या तिथे कोणत्याच सोयी सुविधा उपलब्ध नाही त्याकडे लक्ष दिले जात नाही .

मांद्रे मतदार संघात एकूण नऊ पंचायतीचा समावेश आहे मांद्रे , मोरजी , चोपडे आणि तुये या ठिकाणी मैदाने आहेत , चोपडे व तुये हि नवीन मैदाने उभारलेली आहेत . मात्र मोरजी आणि मांद्रे हि जुनी मैदाने आहेत .

मोरजी मैदान स्थिती

मोरजी मैदान

मोरजी पंचायत क्षेत्रात मैदान व्हावे यासाठी पंचायतीच्या सर्व सरपंच , आतापर्यंत मांद्रे मतदार संघातून निवडून आलेल्या आमदारांनी प्रयज्ञ केले , व तत्कालीन भूतपूर्व क्रीडा मंत्री बांदेकर यांच्या हस्ते व मुख्यमत्री मनोहर पर्रीकर यांच्या उस्थितीत उद्घाटन करण्यात आले . सध्या हे मैदान म्हणजे क्रीडा प्रेमींची डोकेदुखीदु ठरत आहे , ठिकठिकाणी मोडकळीस आले , व्ही आयपी आसन व्यवस्थेवरचे छप्पर मोडून गेले , आसन व्यवस्था आणि संरक्षण भिंतीला तडे गेले , दुरुस्ती साठी टेंडरही झाले मात्र कामाचा पत्ता नाही , मैदानावरची हिरवळ गायब आहे , क्रीडा मंत्री पेडणे तालुक्याचे लोकप्रतिनिधी असूनही या मैदानाकडे लक्ष दिलेले नाही . गावागावातील मैदाने कोणत्या स्थितीत आहेत त्याचा आढावाही त्यांनी कधी घेतलेला नाही .

तुये आणि चोपडे येथील नवीन मैदाने उभारली मात्र मांद्रे येथील मैदानावर आजपर्यंत कोणत्याच सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत . मांद्रे येथील मैदानाची बांधणीसाठी आता केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या खासदार निधीतून करण्यात आले आहे .

गावागावात क्रीडा मैदाने नसल्याने आजही क्रीडा प्रेमीना गावातील शेतात मोकळ्या जागेत क्रीडा स्पर्धा आयोजित करून नवीन खेळाडू तयार करण्यासाठी धडपड करावी लागते .

गावात गावात असलेल्या मैदानाचा लाभ शालेय विध्यार्थ्यासाठी होताना दिसत नाही .जी मैदाने आहेत ती पंचायतीच्या ताब्यात नसल्याने क्रीडा खात्याकडे वारंवार एका दिवसासाठी परवानगी मिळणे कठीण असते . क्रीडा मंत्री बाबू आजगावकर यांनी राष्ट्रीय खेळासाठी प्राधान्य देताना साधन सुविधा जरूर उपलब्ध कराव्यात मात्र गावागावात अजूनही क्रीडांगणे नाहीत त्याठिकाणी त्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी प्रयत्न करायला हवा .

काही भागात क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध नाही , त्या ठिकाणी जागा संपादित करून गावासाठी एक क्रीडांगण हि योजना कार्यानिवीत करावी . गावागावात क्रीडांगणे असली तर खेळाडू तयार होतील अन्यथा त्या खेळाडून प्रशिक्षण प्रक्टिस करण्यासाठी दूर ठिकाणी जावे लागते . याचे भान ठेवावे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT