KL Rahul and Athiya Shetty Dainik Gomantak
क्रीडा

KL Rahul-Athiya Shetti: प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला राहुल-अथियाचे शुभमंगल...

धोनी, विराट, रोहितही सहकुटूंब उपस्थित राहणार

Akshay Nirmale

KL Rahul-Athiya Shetti: भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुल लवकरच बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. राहुल आणि अथियाचे चाहते या स्टार जोडीसाठी खूप आनंदी आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार राहुल आणि अथिया 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. यापूर्वी बीसीसीआयने केएल राहुल कौटुंबिक कारणांमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले होते.

या स्टार कपलच्या लग्नाला देशभरातील आणि जगातील अनेक दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित राहू शकतात. या विशेष यादीत सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या नावांचाही समावेश आहे. हे तिन्ही क्रिकेटपटू आपल्या संपूर्ण कुटुंबासह लग्नाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राहुल आणि अथिया हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बऱ्याचदा विविध ठिकाणी व्हेकेशनवर आणि डिनर डेटवर हे दोघे एकत्र दिसून आले आहेत. दोघांचे एकत्रित फोटोही दोघांनी सोशल मीडियात यापुर्वी शेअर केले होते. या जोडप्याने लग्नाआधीच मुंबईत कार्टर रोड वांद्रे येथे एक 4BHK अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. या घरासाठी त्यांना दरमहा दहा लाख रूपये भाडे असल्याचे समजते. लग्नानंतर हे कपल याच ठिकाणी राहू शकतात.

21 जानेवारीपासून विवाह सोहळा सुरू होणार असून 23 जानेवारीपर्यंत चालणार असल्याचे समजते. दोघांच्या कुटूंबियांकडून लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दोघांचे लग्न दक्षिण भारतीय परंपरांनुसार होणार असून त्यात हळद, मेहंदी, संगीत या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. सुनील शेट्टीच्या आलिशान अशा जहाँ या घरामध्येच हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे समजते. राहुल आणि अथिया दोघेही डिझायनर आउटफिट्समध्ये दिसणार आहेत. अथियाचा आवडता डिझायनर मनीष मल्होत्रा ​​तिच्या लग्नाचा लेहेंगा तयार करत आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT