श्रीलंकेतून दोन सलामी फलंदाज इंग्लंडला पाठविण्याच्या मागणी निवडकर्त्यांनी फेटाळून लावली आहे. Dainik Gomantak
क्रीडा

पृथ्वीला इंग्लंडला पाठविण्याची मागणी निवडकर्त्यांनी फेटाळली

शुभमनने मालिकेतून जरी माघार घेतली असली तरी रोहित सोबत सलामीला मयंक अगरवाल येईल. तर अभिमन्यू ईश्वरला देखील संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय संघाचा (Indian team) सलामीवीर शुभमन गिल (Shubhaman Gill) दुखापतग्रस्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याला इंग्लंड विरुध्दच्या कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्याऐवजी पृथ्वी शॉला (Pruthvi shaw) इंग्लंडला (England) बोलविण्याची मागणी जोर धरु लागली होती. मात्र, यावर संघ निवडकर्त्यांनी निर्णय घेतला आहे. (The selectors rejected the demand to send the Pruthvi to England)

शुभमनच्या जागी श्रीलंकेतून दोन सलामी फलंदाज इंग्लंडला पाठविण्याच्या मागणी निवडकर्त्यांनी फेटाळून लावली आहे. शुभमनने मालिकेतून जरी माघार घेतली असली तरी रोहित सोबत सलामीला मयंक अगरवाल येईल. तर अभिमन्यू ईश्वरला देखील संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आता पृथ्वी श्रीलंके विरुध्दच्या मालिकेत सलामीवीर म्हणून शिखर धवन सोबत दिसेल. भारतीय संघात इंग्लंडमध्ये मयांकसह के.एल.राहुलचा पर्यय आहे. राहुलने कसोटीमध्ये पाच शतके केली आहेत. पण खराब कामगिरीमुळे त्याला संघातून बाहेर जावे लागले. जर भारतीय संघ 7 फलंदाजांसह मैदानात उतरले तर राहुल मधल्या फळीत फलंदाजी करु शकतो.

अभिमन्यु ईश्वरबाबत बोलायचे तर, बंगाकडून खेळणाऱ्या या खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने 64 सामन्यात 43.6 च्या सरासरीने 4401 धावा केल्या आहेत. यात त्याने 13 शतके आणि 18 अर्धशतके केली आहेत. यात त्याने 233 धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT