Ranji Trophy Dainik Gomantak
क्रीडा

Ranji Trophy चा नवा हंगाम 10 फेब्रुवारीपासून होणार सुरु

आयपीएल (IPL 2022) पूर्वी आणि नंतर दोन वेगवेगळ्या टप्प्यात या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. ग्रुप स्टेजचे सामने पहिल्या टप्प्यात खेळवले जातील, तर बाद फेरीचे सामने 30 मेपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात खेळवले जातील.

दैनिक गोमन्तक

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर रणजी ट्रॉफीचा नवा हंगाम सुरु होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सर्व राज्य संघटनांना सांगितले आहे की, ही स्पर्धा 10 फेब्रुवारीपासून सुरु होईल. त्यानुसार आयपीएल (IPL 2022) पूर्वी आणि नंतर दोन वेगवेगळ्या टप्प्यात या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. ग्रुप स्टेजचे सामने पहिल्या टप्प्यात खेळवले जातील, तर बाद फेरीचे सामने 30 मेपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात खेळवले जातील. बोर्ड राज्यांना स्पर्धेचे स्वरुप आणि ठिकाणही सांगणार आहे. यावर्षी 13 जानेवारीपासून रणजी करंडक स्पर्धा (Ranji Trophy) सुरु होणार होती, परंतु देशात आलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ती पुढे ढकलावी लागली होती. (The Ranji Trophy tournament will start on February 10)

दरम्यान, कोरोनामुळे 2021 मध्ये रणजी करंडक स्पर्धा होऊ शकली नव्हती. स्पर्धेच्या 87 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही स्पर्धा होऊ शकली नाही. या वर्षीही पुढे ढकलल्यानंतर ही स्पर्धा पुढे होणार का नाही याची शक्यता वर्तविण्यात येत होती, परंतु राज्य संघटनांच्या विनंतीनंतर बोर्डाने यावर तोडगा काढत स्पर्धा दोन टप्प्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

तसेच, बीसीसीआयने (BCCI) राज्यांना दिलेल्या वेळापत्रकानुसार, पहिला टप्पा 10 फेब्रुवारीपासून सुरु होईल आणि 15 मार्चपर्यंत चालेल. या दरम्यान गट फेरीचे सामने खेळवले जातील. यामध्ये एकूण 34 दिवसांत 57 सामने पूर्ण होतील. यानंतर, आयपीएलचा 15 वा हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होईल, जो मे पर्यंत चालेल आणि त्यानंतरच दुसरा टप्पा सुरु होणार आहे. 30 मे ते 26 जून या कालावधीत उपांत्यपूर्व आणि अंतिम फेरीसह एकूण 7 सामने खेळवले जातील.

स्पर्धेचे स्वरुप

बीसीसीआयने स्पर्धेच्या फॉरमॅटविषयी देखील माहिती दिली आहे, ज्या अंतर्गत 38 संघांना 8 एलिट आणि 1 प्लेट गटात विभागले गेले आहे. एलिट गटातील प्रत्येक गटात 4 संघ, तर दुसऱ्या गटात 6 संघ असतील. एलिट गटातील प्रत्येक संघ उर्वरित संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल, तर प्लेट गटातील प्रत्येक संघाला प्रत्येकी 3 सामने खेळण्याची संधी मिळेल.

स्पर्धेसाठी 9 राज्यांची निवड

मंडळाने स्पर्धेचे ठिकाणही निश्चित केले आहे. हे सर्व सामने 9 शहरांमध्ये होणार आहेत. यामध्ये प्लेट ग्रुपचे सर्व सामने कोलकातामध्ये खेळवले जातील. त्याच वेळी, एलिट गटाचे सामने राजकोट, कटक, त्रिवेंद्रम, दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी, अहमदाबाद आणि हरियाणा (रोहटक आणि गुरुग्राम) मध्ये खेळविण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT