रणजी करंडक (Ranji Trophy 2022) चा लीग टप्पा 16 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत होणार आहे. बीसीसीआयने रणजी ट्रॉफीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. देशातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे, बीसीसीआयला (BCCI) ही स्पर्धा पुढे ढकलणे भाग पडले होते. आधीच्या वेळापत्रकानुसार 13 जानेवारीपासून हे सामना सुरु होणार होते. रणजी ट्रॉफीमध्ये 38 संघ सहभागी होणार असून त्यांचे सामने 8 शहरांमध्ये खेळवले जाऊ शकतात. वृत्तानुसार, रणजी सामने अहमदाबाद (Ahmedabad), कोलकाता, त्रिवेंद्रम, कटक, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद आणि राजकोटमध्ये होणार आहेत. (Ranji Trophy 2022 Schedule Has Been Announced)
दरम्यान, रणजी ट्रॉफीचा फॉरमॅट बीसीसीआयने बदलला असून त्यात चार संघांचे आठ गट असतील, ज्यामध्ये प्लेट गटात सहा संघ असतील. मार्च 2020 मध्ये रणजी ट्रॉफी फायनल झाल्यापासून रेड बॉल फॉरमॅटमध्ये कोणताही राष्ट्रीय स्तरावरील देशांतर्गत सामना खेळला गेला नाही. गेल्या मोसमात रणजी करंडक रद्द झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळालेल्या देशांतर्गत क्रिकेटपटूंनी बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांनी ही स्पर्धा दोन टप्प्यात आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यावर आनंद व्यक्त केला होता. जूनमध्ये बाद फेरी होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.