Harmanpreet Kaur Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs SL: भारतीय संघाने श्रीलंकेचा केला क्लीन स्वीप, हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा त्यांच्याच भूमीवर धुव्वा उडवला.

दैनिक गोमन्तक

INDW vs SLW 3RD ODI: भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा त्यांच्याच भूमीवर धुव्वा उडवला. मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने यजमान श्रीलंकेचा 39 धावांनी पराभव केला. या विजयामुळे कर्णधार हरमनप्रीतसाठी तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका ऐतिहासिक ठरली.

कर्णधार हरमनप्रीतने पहिली वनडे मालिका संस्मरणीय केली

कर्णधार मिताली राजने जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्यानंतर हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) T20 तसेच एकदिवसीय संघाचे पूर्णवेळ कर्णधारपद देण्यात आले. हरमनप्रीतने पूर्णवेळ कर्णधार म्हणून तिच्या पहिल्या वनडे मालिकेत श्रीलंकेचा (Sri Lanka) क्लीन स्वीप केला.

हरमनप्रीत, पूजा आणि शेफाली फलंदाजीत चमकल्या

मालिकेतील तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना (Smriti Mandhana) यांच्याकडून शानदार फलंदाजीची अपेक्षा होती. मात्र मानधनाला केवळ सहाच धावा करता आल्या, तर सलामीवीर शेफालीने 50 चेंडूत 49 धावांची खेळी करत संघाला बळ दिले. शेफाली आणि यास्तिका भाटिया यांनी दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली.

दुसरीकडे, कर्णधार हरमनप्रीत सध्याच्या मालिकेत भारतासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणारी खेळाडू ठरली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिने एका विकेटसह 44 धावा दिल्या. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना हरमनप्रीतने सर्वाधिक 75 धावा केल्या आणि एक विकेटही घेतली.

शिवाय, आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पूजा वस्त्राकरने शानदार अर्धशतक झळकावले. तिने 65 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने 56 धावांची जबरदस्त खेळी केली आणि श्रीलंकेला विजयासाठी 256 धावांचे लक्ष्य दिले.

भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली

या एकदिवसीय मालिकेत वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने चांगलीच छाप पाडली. परंतु शेवटच्या सामन्यात तिला एकही विकेट मिळावता आली नाही. त्यामुळे या मालिकेत श्रीलंकेला प्रथमच 200 धावांचा टप्पा गाठण्यात यश आले. श्रीलंकेसाठी कर्णधार चमारी अटापट्टू, हसिनी परेरा आणि निलाक्षी डी सिल्वा यांनी शानदार फलंदाजी केली परंतु मोठी धावसंख्या उभारण्यात त्या अपयशी ठरल्या. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर मेघना सिंग आणि पूजा वस्त्राकर यांना 2-2 विकेट मिळाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT