IND vs SL Women: हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेवर 4 विकेट्सने मात केली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Women Cricket Team of india
Women Cricket Team of indiaBCCI

INDW vs SLW 1st ODI: भारतीय महिला संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. येथे आज दोन्ही संघांमधील 3 वनडे मालिकेतील पहिला सामना पल्लेकेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (Pallekele International Cricket Stadium), पल्लेकेली येथे खेळला गेला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमानांनी प्रथम फलंदाजी करताना 10 गडी गमावून 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 38 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा करून सामना 4 गडी राखून जिंकला. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिलाच विजय आहे.

नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरल्यानंतर रेणुका आणि दीप्ती यांनी 3-3 विकेट घेतल्या , श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकात कर्णधार चमारी अटापट्टू 8 चेंडूत 2 धावा काढून बाद झाली. 7व्या षटकात हंसिमा करुणारत्ने खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर हसिनी परेराने 37, हर्षिता मडवी 28, कविशा दिलहरी 0, निलाक्षी डी सिल्वा 43, अनुष्का संजीवनी 18, ओशादी रणसिंघे 8, रश्मी डी सिल्वा 7 आणि इनोका रणवीराने 12 धावा केल्या. तर अचिनी कुलसुर्या नाबाद राहिली. भारताकडून रेणुका सिंग आणि दीप्ती शर्माने 3-3, पूजा वस्त्राकारने 2 आणि हरमनप्रीत, राजेश्वरी गायकवाड यांनी 1-1 बळी घेतला.

Women Cricket Team of india
IND vs ENG यांच्यातील 5व्या कसोटीची येथे पहा लाईव्ह स्ट्रीमिंग

172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात फारशी खास झाली नाही. दुसऱ्या षटकात स्मृती मंदाना 4 धावा काढून बाद झाली. यानंतर यास्तिका भाटियाने 1, शेफाली वर्माने 35, कर्णधार हरमनप्रीत कौरने 44, हरलीन देओलने 34 आणि ऋचा घोषने 6 धावा केल्या. तर दीप्ती शर्मा 22 आणि पूजा वस्त्राकरने 21 धावा करून नाबाद राहिले. श्रीलंकेकडून इनोका रणवीराने 4 आणि ओशादी रणसिंघेने 2 बळी घेतले.

Women Cricket Team of india
'विराट 30 धावांपर्यंत पोहोचला तर..', इंग्लंड कसोटी दरम्यान मायकल वॉनचे भाकीत

दोन्ही संघातील प्लेइंग 11

भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंग.

श्रीलंका : हसिनी परेरा, चमारी अट्टापट्टू (कर्णधार), हंसिमा करुणारत्ने, कविशा दिलहारी, हर्षिता मडवी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), ओशादी रणसिंघे, रश्मी डी सिल्वा, इनोका रणवीर, अचिनी कुलसूरिया.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com