IND vs NZ Hockey Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ Hockey World Cup 2023 : भारताचं स्वप्न भंगलं, क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत

IND vs NZ Hockey World Cup 2023: कलिंगा स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध क्रॉसओव्हर सामना गमावल्यानंतर भारतीय हॉकी संघ FIH पुरुष हॉकी विश्वचषकातून बाहेर पडला.

दैनिक गोमन्तक

IND vs NZ Hockey World Cup 2023: कलिंगा स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध क्रॉसओव्हर सामना गमावल्यानंतर भारतीय हॉकी संघ FIH पुरुष हॉकी विश्वचषकातून बाहेर पडला. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन (FIH) विश्वचषक स्पर्धेतील सामना नियमित वेळेत 3-3 असा बरोबरीत राहिला. पेनल्टी शूटआऊटही निर्णय न घेता संपुष्टात आले. सडन डेथमध्ये न्यूझीलंडने सामना जिंकला.

दरम्यान, चौथ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने (New Zealand) गोल करुन स्कोअर 3-3 असा बरोबरीत आणला. सामन्यातील तीन गोल दुसऱ्या क्वार्टरमध्ये तर चौथे आणि पाचवे गोल तिसऱ्या क्वार्टरमध्ये झाले. सहावा गोल चौथ्या क्वार्टरमध्ये झाला. भारताकडून (India) ललित उपाध्याय, वरुण कुमार आणि सुखजित सिंग यांनी गोल केले. तर न्यूझीलंडकडून सॅम लेन, सीन आणि केन यांनी गोल केले.

तसेच, कर्णधार हरमनप्रीतने शूटआऊटमध्ये गोल केला. न्यूझीलंडला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि संघाने बरोबरी साधली. राजकुमारने दुसरा गोल केला. त्यानंतर भारताने 2-1 अशी आघाडी घेतली होती. शूटआऊटमध्ये अभिषेक कमी पडला, तर न्यूझीलंड संघाच्या खेळाडूने गोल केला.

India vs New Zealand Match 4th Quarter

चौथ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंड संघाने भारतावर दडपण आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या सामन्यात भारत आघाडीवर होता. दुसरीकडे, न्यूझीलंडही हार मानायला तयार नव्हता. न्यूझीलंडने 49 व्या मिनिटाला पेनल्टी जिंकली आणि शॉनने बरोबरीचा गोल केला. भारताला 52 व्या मिनिटाला पीसी मिळाला. मात्र हरमनप्रीत पुन्हा अपयशी ठरला. चौथा क्वार्टर संपल्यानंतर स्कोअर 3-3 असा बरोबरीत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT