Hockey World Cup 2023: हॉकी टीम इंडियाला जबरदस्त धक्का! 'हा' धाकड खेळाडू वर्ल्डकपमधून बाहेर

भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू उर्वरित हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
India's Midfielder Hardik Singh
India's Midfielder Hardik SinghDainik Gomantak

Hockey India: भारतात सुरू असलेल्या हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला न्यूझीलंडविरुद्ध रविवारी क्रॉसओव्हरचा महत्त्वपूर्ण सामना खेळायचा आहे. मात्र, त्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारतीय संघाचा मिडफिल्डर हार्दिक सिंग वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याला 15 जानेवारी रोजी भारत विरुद्ध इंग्लंड संघात झालेल्या सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला 19 जानेवारीला झालेल्या वेल्सविरुद्धच्या सामन्यात विश्रांती दिली होती.

पण, त्यानंतरही तो पूर्ण तंदुरुस्त न झाल्याने हॉकी वर्ल्डकप 2023 मधून त्याला बाहेर जावे लागले आहे. त्याच्या जागेवर आता भारतीय संघात राज कुमार पाल याची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

India's Midfielder Hardik Singh
Hockey World Cup 2023 मध्ये भारताचा दुसरा विजय, वेल्सचा दारुण पराभव

याबद्दल भारतीय संघाचे प्रशिक्षर ग्रॅहम रिड यांनी सांगितले की 'रविवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी आणि उर्वरित वर्ल्डकपमधील सामन्यांसाठी एका रात्रीत आम्हाला हार्दिक सिंगचा बदली खेळाडू घोषित करण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला आहे.'

त्यांनी पुढे सांगितले, 'दुखापत तेवढी गंभीर नसली, तरी वेळ आमच्या बाजूने नव्हती. आमच्या रिहॅबिलिटेशन प्रोसेसनंतर आणि कार्यात्मक आणि मैदावावरील हालचालीचे मुल्यांकन केल्यानंतर आम्ही राज कुमार पाल याला हार्दिकच्या जागी भारतीय संघात घेण्याचा निर्णय घेतला आहे.'

रिड यांनी हार्दिकचे अशाप्रकारे बाहेर जाणे निराशाजनक असल्याचे सांगितला म्हटले, 'आमच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत चांगले खेळल्यानंतर अशाप्रकारे बाहेर जाणे हार्दिकसाठी नक्कीच वैयक्तिकरित्या निराशाजनक असेल. पण, आम्ही राज कुमारला उर्वरित वर्ल्डकप सामन्यांमध्ये खेळताना पाहाण्यासाठी उत्सुक आहोत.

India's Midfielder Hardik Singh
Hockey World Cup 2023: भारत-इंग्लंड संघात क्वार्टर-फायनलमध्ये थेट एन्ट्रीसाठी चढाओढ, असे आहे समीकरण

भारताला उपांत्यपूर्व फेरीसाठी विजय आवश्यक

भारतीय संघाने साखळी फेरीतील सामन्यांनंतर ग्रुप डी मध्ये दुसरा क्रमांक मिळवला होता. त्यामुळे आता त्यांना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध क्रॉसओव्हरचा सामना रविवारी खेळावा लागणार आहे.

या सामन्यात विजय मिळवणारा संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहचणार आहे. दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात विजय मिळवणारा संघ 26 जानेवारी रोजी बेल्जियमविरुद्ध उपांत्यपूर्व सामना खेळेल.

ग्रुप डी मध्ये अव्वल क्रमांकावर स्थान मिळवून इंग्लंड संघ आधीच उपांत्यपूर्व फेरीत पोहचला आहे. या ग्रुपमध्ये भारत आणि इंग्लंड यांचे गुण सारखेच होते. दोन्ही संघांनी 2 विजय आणि 1 बरोबरीसह 7 गुण मिळवले होते. मात्र, इंग्लंडने गोलफरकाच्या जोरावर या ग्रुपमध्ये अव्वल स्थान मिळवले.

त्यामुळे भारताला दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागले आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशासाठी क्रॉसओव्हर सामना खेळावा लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com