Brendan Taylor Dainik Gomantak
क्रीडा

झिम्बाब्वेच्या धाकड़ फलंदाजावर ICC ने घातली बंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन मोठी कारवाई !

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि फलंदाज ब्रेंडन टेलरवर साडेतीन वर्षांची बंदी घातली आहे.

दैनिक गोमन्तक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली झिम्बाब्वेचा (Zimbabwe) माजी कर्णधार आणि धाकड फलंदाज ब्रेंडन टेलरवर (Brendan Taylor) साडेतीन वर्षांची बंदी घातली आहे. आयसीसीने ही शिक्षा टेलरला भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. एका भारतीय बुकीकडून स्पॉट फिक्सिंगसाठी पैसे घेतल्याप्रकरणी टेलर दोषी ठरला होता. खुद्द टेलरनेच काही दिवसांपूर्वी हा खुलासा करुन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. टेलरने मात्र आपण कधीही फिक्सिंग केले नसल्याचे स्पष्ट करत आयसीसीला (ICC) माहिती दिली. तथापि, टेलरने कबूल केले की, मी आंतरराष्ट्रीय संस्थेला थोड्या विलंबाने माहिती दिली, कारण मला स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची भीती होती. याशिवाय डोपिंगच्या एका वेगळ्या प्रकरणातही टेलरवर एका महिन्याची बंदी घालण्यात आली आहे. (The ICC Has Banned Former Zimbabwe Captain Brendan Taylor For Three-And A Half Years)

दरम्यान, आयसीसी त्याच्यावर कारवाई करणार असून त्याच्यावर बंदी घालण्यात येणार असल्याचे टेलरने आपल्या खुलाशात सांगितले होते. शुक्रवार 28 जानेवारी रोजी, आयसीसीने अधिकृत प्रेस रिलीज जारी करुन याची पुष्टी केली. तसेच टेलरला साडेतीन वर्षांसाठी क्रिकेटचे सर्व फॉरमॅट खेळण्यास बंदी घातली आहे. आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, टेलरने भ्रष्टाचाराचे चार आणि डोपिंगशी संबंधित एक आरोप स्वीकारला आहे. टेलरवरही डोपिंगसाठी एका महिन्याची बंदी घालण्यात आली आहे, जे भ्रष्टाचार (Corruption) प्रकरणापासून वेगळे आहे. मात्र, दोन्हींची शिक्षा एकाचवेळी चालणार आहे.

आयसीसीच्या म्हणण्यानुसार, टेलरवर भ्रष्टाचाराची तक्रार करण्यास विलंब करण्याशी संबंधित चार आरोप होते, जे झिम्बाब्वेच्या माजी सलामीवीराने मान्य केले. त्यानुसार, टेलरला ACU च्या कलम 2.4.2 मध्ये दोषी ठरवण्यात आले. या अंतर्गत, टेलरने भेटवस्तू, देयके किंवा भ्रष्टाचाराशी संबंधित प्रयत्नांमुळे मिळालेल्या इतर लाभांची तक्रार करण्यास विलंब केला. तसेच 2.4.3 नुसार, टेलर US$750 किंवा त्याहून अधिक किमतीच्या भेटवस्तूंचा वेळेवर अहवाल देण्यात अयशस्वी ठरला. तसेच 2.4.4 अंतर्गत, श्रीलंका आणि बांग्लादेश विरुद्ध झिम्बाब्वेच्या सामन्यांमध्ये भ्रष्टाचारात गुंतल्याबद्दल टेलरने तक्रार नोंदवली नाही. पुढे, 2.4.7 नुसार, टेलरने तथ्ये, कागदपत्रे दडपून किंवा छेडछाड करुन तपासात विलंब किंवा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT