टीम इंडियात 'या' चार खेळाडूंना द्यावी संधी : युवराज सिंह

कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा आणि ऋतुराज गायकवाड यांना संघात पाहून आनंद झाला! ते सर्व बीसीसीआयच्या पात्रतेचे होते.
Yuvraj Singh
Yuvraj SinghDainik Gomantak
Published on
Updated on

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने वेस्ट इंडिजविरुद्धच्या होम सीरिजसाठी 26 जानेवारीला जाहीर केलेल्या भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघांबद्दल आपले विचार ट्विट च्या माध्यमातून त्याने आपले विचार शेअर केले. 2007 मध्ये भारताला टी-20 आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या युवराज सिंगने भारतीय संघातील अशा चार खेळाडूंची नावे दिली आहेत, ज्यांना संघात ठेवून चांगला निर्णय घेतला आहे.

Yuvraj Singh
वॉर्नर अन् ब्राव्होनंतर शाकिब अल हसनचा 'पुष्पा' जलवा !

युवराज सिंगने (Yuvraj Singh) ट्विट च्या माध्यमातून चार सर्वाधिक पात्र क्रिकेटपटूंची नावे ट्विट केली. या ट्विटमध्ये त्याने डावखुरा फिरकीपटू (स्पिनर) कुलदीप यादव, फिरकी गोलंदाजी ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर, मधल्या फळीतील फलंदाज दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांचे नाव घेतले आणि त्यांचे अभिनंदन केले. त्याने लिहिले आहे की, "कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा आणि ऋतुराज गायकवाड यांना संघात पाहून आनंद झाला! ते सर्व बीसीसीआयच्या पात्रतेचे होते."

गेल्या वर्षी श्रीलंकेत (Sri Lanka) भारताकडून खेळलेला कुलदीप यादव आता गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला आहे. तो पुन्हा युजवेंद्र चहलसोबत (Yuzvendra Chahal) जोडीने खेळतांना दिसणार आहे. मधल्या फळीत वेगवान धावा करू शकणाऱ्या आणि सहाव्या गोलंदाजाची भूमिका बजावणाऱ्या दीपक हुडाची भारताच्या एकदिवसीय संघात प्रथमच निवड करण्यात आली आहे. आर अश्विनपूर्वी वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) हा संघाचा खेळाडू होता, मात्र दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता.

मात्र, आता पुन्हा एकदा निवडकर्त्यांनी या ऑफस्पिनरला संधी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) एकदिवसीय मालिकेसाठीही त्याची संघात निवड झाली होती, मात्र कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला संघाबाहेर व्हावे लागले होते. ऋतुराज गायकवाडही (Ruturaj Gaikwad) संघात आहे, पण रोहित शर्माच्या संघात पुनरागमन झाल्यामुळे तो खेळण्याची शक्य वाटत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com