Shabnim Ismail Dainik Gomantak
क्रीडा

The Hundred League 2023: शबनम इस्माईलने हॅटट्रिक घेत रचला इतिहास, शेवटच्या षटकात केला करिष्मा

Shabnim Ismail: दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनम इस्माईलने या लीगमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली.

Manish Jadhav

The Hundred League 2023: इंग्लंडमध्ये सध्या महिला संघांमध्ये हंड्रेड लीग खेळली जात आहे. दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनम इस्माईलने या लीगमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली.

10 ऑगस्ट रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात, तिने बर्मिंगहॅम फिनिक्स विरुद्ध हॅट्ट्रिक घेतली आणि आपल्या संघाला हरत असलेला सामना जिंकून दिला. तिने शेवटच्या 5 चेंडूत 8 धावांचा बचाव केला.

दरम्यान, हंड्रेड महिला स्पर्धेचा 14 वा सामना वेल्श फायर आणि बर्मिंगहॅम फिनिक्स यांच्यात झाला. या रोमांचक सामन्यात वेल्स फायरच्या संघाने 3 धावांनी विजय मिळवला.

शबनम स्माइलने शेवटच्या 3 चेंडूत 3 विकेट घेत सामन्याचा रंग बदलला आणि द हंड्रेड स्पर्धेच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारी दुसरी महिला गोलंदाज ठरली.

हॅट्ट्रिक घेणारी एलना किंग पहिली गोलंदाज

शबनमच्या आधी एलना किंगने ही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. द हंड्रेड महिला स्पर्धेच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारी ती पहिली गोलंदाज आहे.

2022 मध्ये, ट्रेंट रॉकेट्सकडून खेळताना, एलना किंगने मँचेस्टर ओरिजिन्सविरुद्ध हॅट्ट्रिक घेण्याची अप्रतिम कामगिरी केली होती. त्याचबरोबर पुरुषांच्या द हंड्रेड स्पर्धेत इम्रान ताहिरने (Imran Tahir) हॅट्ट्रिक घेण्याची अप्रतिम कामगिरी केली आहे.

जर सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, 100 चेंडूंच्या या सामन्यात वेल्स फायर संघाने प्रथम खेळताना 7 गडी गमावून 137 धावा केल्या. प्रत्युत्तरात बर्मिंगहॅम फिनिक्स संघ 4 गडी गमावून केवळ 134 धावा करु शकला आणि सामना 3 धावांनी गमावला.

शेवटच्या षटकात विजयासाठी आठ धावा आवश्यक होत्या, परंतु वेगवान गोलंदाज शबनमने हॅट्ट्रिक घेत सामन्याचे चित्र पालटले. तिने 20 चेंडूत 31 धावा देत 3 बळी घेतले. शेवटच्या तीन चेंडूत तिने या विकेट घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT