FIFA World Cup 2026 Hosts And Time Table 
क्रीडा

FIFA World Cup 2026 ची फायनल न्यू यॉर्कमध्ये, तीन देशांतील 16 शहरांमध्ये रंगणार महासंग्राम

FIFA World Cup 2026 Host Countries:1994 चा विश्वचषक देखील युनायटेड स्टेट्समध्ये पार पडला होता आणि अंतिम सामना लॉस एंजेलिस जवळ पासाडेना येथील रोझ बाउल येथे आयोजित करण्यात आला होता.

Ashutosh Masgaunde

The Final Of The FIFA World Cup 2026 Will Be Played In New Jersey New York, 16 cities Of Canada, Mexico and USA Will Host The Matches:

2026 मध्ये, FIFA विश्वचषक फायनल अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील न्यूयॉर्क येथील मेटलाइफ स्टेडियमवर होणार आहे. फिफाच्या आयोजकांनी नुकतीच याची घोषणा केली.

वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 11 जूनपासून मेक्सिको सिटीतील प्रतिष्ठित अझ्टेक स्टेडियमवर सुरू होईल. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो म्हणाले की, "आतापर्यंतचा सर्वात समावेशक आणि प्रभावी फिफा विश्वचषक आता स्वप्न राहिलेला नाही तर वास्तव आहे कारण तो कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्समधील 16 अत्याधुनिक स्टेडियममध्ये होणार असून, संपूर्ण स्पर्धेत 104 सामने रंगणार आहेत."

फिफा अध्यक्षांनी सांगितले की, अटलांटा आणि डॅलस येथे उपांत्य फेरीचे आयोजन केले जाणार असून, तिसऱ्या स्थानासाठीचा सामना मियामीमध्ये खेळले जाईल.

उपांत्यपूर्व फेरीचे सामने लॉस एंजेलिस, कॅन्सस सिटी, मियामी आणि बोस्टन येथे खेळले जातील. तीन देशांमधील एकूण 16 शहरे या स्पर्धेचे आयोजन करतील, त्यातील बहुतांश सामने युनायटेड स्टेट्समध्ये होतील.

1994 चा विश्वचषक देखील युनायटेड स्टेट्समध्ये पार पडला होता आणि अंतिम सामना लॉस एंजेलिस जवळ पासाडेना येथील रोझ बाउल येथे आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान उत्तर अमेरिकेतील थेट दूरचित्रवाणीवर 2026 च्या फिफा विश्वचषकाच्या आयोजनाबाबतची घोषणा करण्यात आली. यावेळी इन्फँटिनो तसेच अभिनेता केविन हार्ट, रॅपर ड्रेक आणि सेलिब्रिटी किम कार्दशियन उपस्थित होते.

या स्पर्धेत ४८ संघ सहभागी होणार असून एकूण १०४ सामने होणार आहेत. 16 शहरे या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.

या शहरांमध्ये रंगणार सामने

अटलांटा, बोस्टन, डॅलस, ग्वाडालजारा, ह्यूस्टन, कॅन्सस सिटी, लॉस एंजेलिस, मेक्सिको सिटी, मियामी, मॉन्टेरी, न्यूयॉर्क-न्यू जर्सी, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को बे एरिया, सिएटल, टोरंटो आणि व्हँकुव्हर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT