Ranji Trophy: गोव्याकडून चुकांची पुनरावृत्ती; तमिळनाडूला विजयासाठी 76 धावांची गरज

Ranji Trophy: विजयासाठी 137 धावांचे आव्हान मिळालेल्या तमिळनाडूला सामन्याच्या अखेरच्या चौथ्या दिवशी सोमवारी आणखी 76 धावांची गरज असून नऊ विकेट बाकी आहेत.
S. Ajit Ram and R. Sai Kishore
S. Ajit Ram and R. Sai KishoreDainik Gomantak
Published on
Updated on

Ranji Trophy: गोव्याने पहिल्या डावातील चुकांची पुनरावृत्ती दुसऱ्या डावातही रविवारी केली, परिणामी त्यांना रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात आणखी एक पराभव खुणावू लागला आहे. विजयासाठी 137 धावांचे आव्हान मिळालेल्या तमिळनाडूला सामन्याच्या अखेरच्या चौथ्या दिवशी सोमवारी आणखी 76 धावांची गरज असून नऊ विकेट बाकी आहेत.

दरम्यान, पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तमिळनाडूचा कर्णधार आर. साई किशोर (4-82), एस. अजित राम (4-36) रंजन पॉल (2-18) या फिरकी त्रिकुटाने गोव्याचा दुसरा डाव 168 धावांत गुंडाळला. पहिल्या डावात 32 धावांनी पिछाडीवर राहिल्यामुळे गोव्यापाशी एकूण 136 धावांची आघाडी घेतली.

तिसऱ्या दिवसाअखेर तमिळनाडूने नारायण जगदीशन (4) याला गमावून 1 बाद 61 धावा केल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळने त्याला त्रिफाळाचीत बाद केले. सुरेश लोकेश्वर (34) आणि प्रदोष रंजन पॉल (22) यांनी गोव्याच्या दर्शन आणि मोहित रेडकर यांचा फिरकी मारा खेळून काढताना दिवसअखेर दुसऱ्या विकेटसाठी 48 धावांची अभेद्य भागीदारी केली.

S. Ajit Ram and R. Sai Kishore
Ranji Trophy Cricket: सुयशच्या शतकानंतर गोव्याची हाराकिरी

यजमानांना धक्का

गोव्याने पहिल्या डावात 8 धावांत अखेरच्या 6 विकेट गमावल्या होत्या. शनिवारी दुसऱ्या डावात त्यांनी अखेरच्या 6 विकेट 29 धावांत गमावल्या, त्यापैकी 5 गडी 13 धावांत गारद झाले. पहिल्या डावातील शतकवीर सुयश प्रभुदेसाई याने दुसऱ्या डावातही झुंजारपणे खिंड लढवली. के. व्ही. सिद्धार्थ (32) याचा अपवाद वगळता इतर फलंदाज त्याला साथ देऊ शकले नाहीत.

सुयश-सिद्धार्थ यांनी तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. सलग दुसऱ्या शतकाच्या वाटेवर असलेल्या सुयशला अजित राम याने पायचीत बाद केले. त्याचा स्वीप फटक्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे शतकाला 21 धावा कमी पडल्या. त्याने 183 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 79 धावा केल्या. त्यानंतर अजित रामने आणखी तीन गडी बाद करत गोव्याचा डाव लगेच संपवला. गोव्याच्या प्रमुख फलंदाजांत ईशान गडेकर (8) आणि मंथन खुटकर (0) सलग दुसऱ्या डावात दुहेरी धावसंख्या गाठण्यात अपयशी ठरले.

S. Ajit Ram and R. Sai Kishore
Ranji Cricket Trophy: पंजाबने उडवला गोव्याचा धुव्वा; तासाभरातच विजयाला गवसणी

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: 241

तमिळनाडू, पहिला डाव: 273

गोवा, दुसरा डाव (बिनबाद 10 वरुन): 65.5 षटकांत सर्वबाद 168 (सुयश प्रभुदेसाई 79, ईशान गडेकर 8, मंथन खुटकर 0, के. व्ही. सिद्धार्थ 32, दर्शन मिसाळ 12, दीपराज गावकर 9, अर्जुन तेंडुलकर 8, समर दुभाषी 0, मोहित रेडकर 4, लक्षय गर्ग नाबाद 5, हेरंब परब 4, आर. साई किशोर 4-82, प्रदोष रंजन पॉल 2-18, एस. अजित राम 4-36).

तमिळनाडू, दुसरा डाव: 26 षटकांत 1 बाद 61 (सुरेश लोकेश्वर नाबाद 34, प्रदोष रंजन पॉल नाबाद 22, दर्शन मिसाळ 13-3-22-1, अर्जुन तेंडुलकर 2-0-5-0, मोहित रेडकर 11-0-33-0).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com