इंग्लंडने पाकिस्तानचा 3 विकेटने पराभव करत, मालिकेत पाकिस्तानला 3-0 असा व्हाईटवॉश देत मालिका खिशात घातली आहे. Dainik Gomantak
क्रीडा

एका रात्रीत उभ्या केलेल्या इंग्लंड संघाने पाकिस्तानला दिला व्हाईटवॉश

इंग्लंड आणि पाकिस्तान संघांमध्ये झालेल्या तिसऱ्या सामान्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 3 विकेटने पराभव करत, मालिकेत पाकिस्तानला 3-0 असा व्हाईटवॉश देत मालिका खिशात घातली आहे.

दैनिक गोमन्तक

इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakistan) संघांमध्ये झालेल्या तिसऱ्या सामान्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 3 विकेटने पराभव करत, मालिकेत पाकिस्तानला 3-0 असा व्हाईटवॉश (Whitewash) देत मालिका खिशात घातली आहे.(The England team, which was formed in one night, gave a whitewash to Pakistan)

कोरोनाच्या (Covid 19) सावटखाली झालेल्या या मालिकेत इंग्लंडचा संघ कोरोनाच्या विळख्यात सापडल्यावर ईसीबीने (ECB) एका रात्रीत नवीन संघ तयार केला. या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला विजयासाठी 332 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य इंग्लंडने 48 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. इंग्लंडकडून जेम्स व्हिन्सनने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत, सर्वाधिक 102 धावा केल्या आणि इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. या शिवाय लुईस ग्रेगरीने 77 धावा केल्या.

या आधी पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने देखील शतक ठोकत सर्वाधिक 158 धावा करत, पाकिस्तानने 50 षटकांत 6 बाद 331 केल्या होत्या. कर्णधार बाबर आझमने कारकिर्दीतील 14 शतक केले. सर्वात कमी डावात 14 शतके करण्याचा विक्रम देखील त्याने केला. त्याने 81 एकदिवसीय सामन्यात 14 शतके पूर्ण केली आहेत. बाबर शिवाय मोहम्मद रिझवानने 58 चेंडूत 74 धावा केल्या. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सने 5 गडी बाद केले.

एकवेळ इंग्लंडची 24 षटकांत 5 बाद 165 अशी अवस्था झाली होती. व्हिन्सने लुईस ग्रेगरी सोबत 129 धावांची भागीदारी करत, इंग्लंडचा विजय सहज शक्य झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT