पाकिस्तान विरुध्दच्या मालिकेसाठी इंग्लंड संघाचे नेतृत्व अष्टपैलू बेन स्टोक्सकडे

ब्रिस्टॉल येथे काल खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली या चाचणीमध्ये इंग्लंडच्या संघातील 7 खेळाडूंची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. नंतर पूर्ण संघ पुन्हा नवीन निवडण्यात आला आहे.
पाकिस्तान विरुध्दच्या मालिकेसाठी इंग्लंड संघाचे नेतृत्व अष्टपैलू बेन स्टोक्स याच्याकडे देण्यात आले आहे.
पाकिस्तान विरुध्दच्या मालिकेसाठी इंग्लंड संघाचे नेतृत्व अष्टपैलू बेन स्टोक्स याच्याकडे देण्यात आले आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

इंग्लंडमध्ये (England) कोरोनाने (Covid 19) पुन्हा डोकेवर काढले असून, इंग्लंड संघातील खेळाडूंना कोरोनाचा फटका बसला आहे. इंग्लंड संघातील तीन क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफमधील चौघांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समोर आल्याने इंग्लंड संघात खळबळ उडाली आहे. (All-rounder Ben Stokes leads the England squad for the series against Pakistan)

पाकिस्तान (Pakistan) विरुध्दच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर इंग्लंड संघाचे नेतृत्व अष्टपैलू बेन स्टोक्स (all-rounder Ben Stokes) याच्याकडे देण्यात आले आहे.

पाकिस्तान विरुध्दच्या मालिकेसाठी इंग्लंड संघाचे नेतृत्व अष्टपैलू बेन स्टोक्स याच्याकडे देण्यात आले आहे.
India vs Sri Lanka: WTC Final मध्ये पराभवानंतर क्रिकेट प्रेमींचं लक्ष्य भारताच्या युवा फळीकडे

इंग्लंड विरुध्द पाकिस्तान यांच्या तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने होणार आहेत. यासाठी ब्रिस्टॉल येथे काल चाचणी घेण्यात आली या चाचणीमध्ये इंग्लंडच्या संघातील 7 खेळाडूंची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. ही चाचणी श्रीलंकेसोबत झालेल्या मालिकेनंतर दुसऱ्याच दिवशी घेण्यात आली होती. या खेळाडूंना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

संघ निवडीबाबत बोलताना ECB चे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले, आम्ही पूर्ण विचार करुन नवीन संघ निवडला आहे. या मालिकेतून स्टोक्स पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. ही गोष्ट अमच्यासाठी आनंदाची आहे. सध्या विलगीकरणात असलेल्या काही खेळाडू टी-20 मालिकेसाठी उपलब्ध असतील. बेन स्टोक्सने यापूर्वी देखील संघाचे नेतृत्व केले आहे. पाकिस्तान विरुध्दच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ पुढील प्रमाणे :

बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक बॉल, डॅनी ब्रिग्ज, ब्रिडन कार्से, झॅक क्राऊली, बेन डकेट, लुईस ग्रेगरी, टॉम हेल्म, विल जॅक्स, डॅन लॉरेन्स, शकिब मेहमूद, डेविड मलान, क्रेग ओव्हर्टन, मॅट पार्किन्सन, डेव्हिड पेने, फिल साल्ट, जेम्स व्हिन्स, जॉन सिम्प्सन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com